Today we want to eat, not firecrackers 
कोल्हापूर

आज फटाके फोडायचे नाही तर खायचेत

मतीन शेख

कोल्हापूर : दिवाळी म्हणलं की फराळाची रेलचेल, पणत्यांची रोषणाई अन्‌ बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्र असणारी फटाक्‍याची आतषबाजी. परंतू मोठ्या आवाजाच्या आणि प्रदुषण करणाऱ्या फटाक्‍यांना टाळून यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतलाय, पण मग मुलांच्या हट्टाचं काय? तर त्यावर पर्याय म्हणून यंदा बच्चे कंपनीसाठी चॉकलेट फटाके मिठाईचे आगमन झाले आहे. मंगळवारपेठतील संतोष व प्राजक्ता शिंदे या दाम्पत्यांनी फटाक्‍याच्या प्रतिकृतीचे चॉकलेट बनवण्याच्या प्रयोग केला आहे. याला बच्चे कंपनी कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
लॉकडाऊनमध्ये शिंदे दाम्पत्याची पुण्यातील नोकरी गेली आणि त्यांना कोल्हापूरला परतावं लागलं. या दिवाळीत बसुन काय करायचं असा विचार करताना फटाके सारखी दिसणारे चॉकलेट बनवण्याची कल्पना सुचली. चॉकलेट पेस्ट, सुका मेवा, मिल्क पावडर साहित्य खरेदी करून घरीच बनविण्यास सुरूवात केली. फटाक्‍याच्या आकाराच्या साच्यामध्ये चॉकलेटचा आकार दिला आणि हा प्रयोग यशस्वी झाला. रॉकेट, बॉम्ब, बंदुक, भुईचक्कर अशा विविध फटाक्‍याच्या प्रतिकृती चॉकलेट मध्ये बनवल्या. त्यांना रंगबेरंगी कागदात पॅक करून याचे गिफ्ट बॉक्‍स तयार केले आहेत. 

या चॉकलेट फटाकाचे फोटो त्यांनी व्हॉट्‌स ऍप, फेसबुकवर टाकताच लोकांकडून याची विचारणा होऊ लागली. लोकांच्या मागणीला प्रतिसाद देत अधिक चॉकलेटची निर्मिती त्यांनी सुरु केली आहे. नातेवाईक, मित्र परिवारासह शहरातील लोकांकडून त्यांना सध्या ऑर्डर्स मिळत आहेत. लहान मुलांना फटाक्‍यांपासून दूर ठेवत हे चॉकलेट फटाके गिफ्ट देण्याला पसंती दिली जात आहे. तसेच पाहुण्यांना ऑफीस मधिल सहकार्यांना भेट देण्यासाठी देखील हे पॅकेट दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदुषण टाळण्यासाठी या चॉकलेट फटाक्‍यांच्या निर्मितीचा शिंदे दाम्पत्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. 

दृष्टीक्षेपात - 
10 चॉकलेटचे 1 पॅकेट, दिवसाला 30 ते 40 पॅकेटची ऑर्डर 
व्हॉट्‌स ऍपवर घेतली जाते. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट पर्यास उपब्ध केला आहे. 


लहान मुलांना चॉकलेट आवडतात. त्यांच्या फटाक्‍यांच्या हट्टाला हा चांगला पर्याय ठरु शकतो, असा आम्ही विचार केला. आम्ही निर्मिती सुरु केली आणि लोकांचा, लहान मुलांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- संतोष व प्राजक्ता शिंदे

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT