कोल्हापूर

इचलकरंजीत मंगळवारी होड्यांच्या शर्यती

CD

इचलकरंजीत मंगळवारी
होड्यांच्या शर्यती
इचलकरंजी, ता. १२ : येथील श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ४ वाजता पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती होणार आहेत. याबाबतची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळातर्फे पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या भव्य शर्यती घेण्यात येतात; पण कोरोनाच्या काळात ही परंपरा खंडित झाली होती. या वर्षापासून पुन्हा या शर्यती घेण्यात येत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक हौशी बोट क्लब या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत.
उद्‍घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, तर बक्षीस समारंभ अपर जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या हस्ते व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी रवींद्र माने, तानाजी पोवार, जयवंत लायकर, बाळासाहेब कलागते, दिलीप मुथा, के. व्ही. पालनकर, अमृता भोसले, जयराज पाटील, अनिल स्वामी उपस्थित राहणार आहेत. यावेळी होड्यांच्या शर्यतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. विजय माळी व गणेश बरगाले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Majalgaon Telgaon Road Accident : माजलगावजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला देवीच्या दर्शनला निघाले पण...

Kolhapur Mangav Murder Case : मंदिरातून परतताना अल्पवयीन मुलगीचा धारदार शस्त्राने खून, कोल्हापुरातील माणगाव धक्कादायक घटना; आरोपीचा अद्यापही शोध नाही

Gokul Election Controversy : गोकुळच्या निवडणुकीत अंधश्रद्धेला खतपाणी? बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो!; के. पी. पाटलांच्या विधानाने खळबळ

राखी सावंतच्या अडचणीत वाढ; १६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट, अभिनेत्रीमुळे गेलेला एकाचा जीव

Latest Marathi News Live Update : दक्षिण चेन्नईतील अनेक निवासी भागांत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT