कोल्हापूर

कात्यायनी मंदिरातील तीन लाखाचा ऐवज चोरीला

CD

कात्यायनी देवीच्या मंदिरातील
तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला
पाच किलो वजनाची प्रभावळ, मूर्ती चोरीस

कळंबा, ता. २ः नवदुर्गांपैकी एक असलेल्या श्री कात्यायनी देवीच्या मंदिरातील पाच किलो वजनाची प्रभावळ व सात देवदेवतांच्या मूर्ती असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला. सोमवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तिघे चोरटे कैद झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी मंदिरात असाच चोरीचा प्रकार घडला होता. त्यावेळी देवीच्या नित्य पूजनातील चांदीच्या वस्तू व पूजेचे साहित्य चोरट्यांनी घेऊन पोबारा केला होता.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्री कात्यायनी देवीच्या मंदिराचे लोखंडी गेट व मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातील सागवानी लाकडी दरवाजा चोरट्यांनी तोडून मंदिरातील देवीची पाच किलो वजनाची चांदीची प्रभावळ, देव-देवतांच्या लहान चांदीच्या सात मूर्ती, गंधाची चांदीची डबी असा सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवीच्या दैनंदिन पूजेसाठी मंदिरात आल्यानंतर लोखंडी गेट व लाकडी दरवाजा याची तोडफोड झाल्याचे पुजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीला आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती करवीर पोलिसांत दिली. यावेळी पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली. तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामध्ये तीन संशयित चोरटे चांदीचा ऐवज घेऊन पोबारा करत असल्याचे दिसत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक शिंदे यांनी चोरट्यांच्या तपासासाठी दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेची माहिती पुजारी राजू गुरव यांनी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष अमर जत्राटे यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT