कोल्हापूर

एम.आर. हायस्कूल महोत्सव

CD

एम. आर. हायस्कूलचा शताब्दी महोत्सव रविवारपासून


गडहिंग्लज : येथील महाराणी राधाबाई (एम. आर.) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शताब्दी महोत्सवाला २९ जानेवारी (रविवार) रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्त आजी-माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारी १९२३ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी या प्रशालेची स्थापना केली. या शंभर वर्षाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा कार्यक्रम २९ जानेवारीला होत आहे. यादिवशी सकाळी ज्योतीचे स्वागत होईल. त्यानंतर शोभायात्रा, १० वाजता शताब्दी महोत्सवाचे उद्‌घाटन, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सायंकाळी आजी-माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. प्राचार्य संजय कुंभार, आजी-माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष निशिकांत गोरुले, उपाध्यक्ष बाळ ऊर्फ पोटे-पाटील, संकेत देसाई, सचिन शहा यांच्यासह सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. २८ जानेवारीपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

Mumbai News: सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती बँकॉकहून आली; मुंबईत थेट कस्टमच्या जाळ्यात अडकली, प्रसिद्ध मॉडेलवर मोठी कारवाई

ST Employees Protest: प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको, प्रताप सरनाईकांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT