कोल्हापूर

चांगले काम करणाऱ्यांना सहकार्य करा

CD

chd235.jpg
77744
कोळींद्रे ः विकासकामांचे उद्‍घाटन करताना आमदार राजेश पाटील. शेजारी अल्बर्ट डिसोझा, सरपंच वंदना सावंत, जनार्दन बामणे आदी.
---------------------------------------
चांगले काम करणाऱ्यांना सहकार्य करा
आमदार राजेश पाटील; कोळींद्रे येथे विविध विकासकामांचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः अलिकडच्या काळात विकासकामांपेक्षा निवडणुकीच्या काळात पैसे वाटणारे प्रतिनिधी निवडून येत आहेत. यामुळे चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे खच्चीकरण होते. पर्यायाने समाजाचेही नुकसान होते. नागरीकांनी चांगले काम करणाऱ्यांच्या मागे राहून सामाजिक विकास साधायला हवा, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
कोळिंद्रे (ता. आजरा) येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्‍घाटन त्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच वंदना सावंत अध्यक्षस्थानी होत्या. गावात अंतर्गत रस्त्यासाठी १८ लाख, कोळींद्रे ते नेसरी रस्त्यासाठी ७५ लाख, पोश्रातवाडी (ता. आजरा) येथे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले होते. ही कामे पूर्ण झाली. त्याचे आमदार पाटील यांच्याहस्ते लोकार्पण केले. आमदार पाटील पहिल्यांदाच गावात आल्याने ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते झाला.
माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या विचारांचा अंगीकार करुन मी समाजकार्यात कार्यरत आहे. यापुढील काळातही या विभागातील विकासकामांना माझे नेहमीच पाठबळ राहिल, असे आश्वासन त्यांनी दिले. माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनीही मनोगत व्यक्त केले. अभय देसाई, एस. एल. पाटील, जनार्दन बामणे, एम. एस. पाटील, शंकर उगाडे, सुरेश करडे, तानाजी बुगडे, गोविंद नारळकर, विजय कांबळे, ग्रामसेवक विक्रमसिंह देसाई, रेखा जाधव, मेघा जाधव, सुभाष सावंत उपस्थित होते. प्रा. सुरेश बुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयराम संकपाळ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी ६ कोटी रुपये, गौमत गंभीरला किती?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

IPL 2026: वर्ल्ड कप विजेते २ कर्णधार, उपविजेता कर्णधार अन् फायनलमधील सामनावीर; Hardik Pandyaच्या नेतृत्वाखाली चार स्टार खेळणार

SCROLL FOR NEXT