कोल्हापूर

गोकुळ बातमी

CD

14804
कोल्हापूर : शिंदेवाडी (ता. कागल) येथील वैरण उत्पादन कंपनीला नोदणी पत्र देताना अरुण डोंगळे, शेजारी योगेश खराडे, पुंडलिक खराडे, पांडुरंग ढेरे व अन्य.

गावोगावी वैरण बँक ही गरज
अरुण डोंगळे; वैरण विकास कंपनीला नोंदणीपत्र
कोल्हापूर, ता. ८ : दुग्धव्यवसायामध्ये सकस वैरणीचे महत्त्व मोठे आहे. त्यावर उपाय म्हणून वैरण उत्पादन कंपन्या तयार होणे, ही काळाची गरज आहे, असे मत ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ)च्या ताराबाई पार्क कार्यालय येथे शिंदेवाडी (ता. कागल) येथे स्थापन झालेल्या कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र डोंगळे यांच्या हस्ते संस्थेस देण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन योगेश खराडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
डोंगळे म्हणाले, ‘‘गोकुळ’ने नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून दूध उत्पादकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र शासन व एन. डी. डी. बी.च्या सहकार्याने १०० कंपन्या (वैरण बँका) स्थापन करण्याची योजना राबविली जात असून, यायोजनेअंतर्गत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिंदेवाडीत पहिलीच कंपनी (वैरण बँक) स्थापन झाली असून, या कंपनीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना कमीत कमी दरामध्ये ओला व सुका चारा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.’’
लहान शेतकऱ्यांना वैरणीची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तरुणांना उद्योजक बनिविणे हा याचा उद्देश आहे. हिरवा चारानिर्मिती, खरेदी, विक्री सायलेजनिर्मिती विक्री, असे व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून होणार आहेत. या मुळे दुग्धव्यवसाय वाढीस चालना मिळणार असल्याने गावोगावी वैरण बँका स्थापन व्हाव्यात.’’ कार्यक्रमाला कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. उदयकुमार मोगले, डॉ. दयावर्धन कामत, भरत मोळे, पुंडलिक खराडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT