Sanyogitaraje Kolhapur Loksabha Election
Sanyogitaraje Kolhapur Loksabha Election esakal
कोल्हापूर

संयोगीताराजेंची 'ती' पोस्ट अन् राजकीय चर्चेला उधाण; कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली!

सकाळ डिजिटल टीम

काल मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अंतरिम चर्चा झाली, पण निर्णय आज होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha Election) मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांचे नाव आघाडीवर आहे. त्याला दुजोरा देणारा फोटो त्यांच्या स्नुषा व माजी खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापूर लोकसभेसाठी ‘महाविकास’चा उमेदवार कोण याची उत्सुकता वाढली आहे. अशातच संयोगिताराजे (Sanyogitaraje) यांनी शाहू छत्रपती महाराज हे माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अलिंगन देतानाचा फोटो सकाळी दहा वाजता समाज माध्यमावर शेअर केला आला. कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेवर अंतिम निर्णय येत असताना व्हायरल झालेल्या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांचे देखील नाव समोर आले होते. आज मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अंतरिम चर्चा झाली, पण निर्णय आज होण्याची शक्यता आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यास शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आज हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावरून लोकसभेसाठी छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असेल, ही शक्यता दाट झाली. त्यात संभाजीराजे स्वतः की शाहू महाराज याची उत्सुकता असेल.

कोल्हापूरचा उमेदवार कोण असेल?

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा सुरू असतानाच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा संयोगीताराजे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोची चर्चा सुरू आहे, फोटोत शेजारी संयोगीताराजेही दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT