Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur esakal
कोल्हापूर

Loksabha Election : शाहू छत्रपतींबद्दल आदरच, पण महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू - मुश्रीफ

आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची त्या पाठीमागची भावना होती.

सकाळ डिजिटल टीम

‘मुश्रीफ यांना शाहू छत्रपतींबद्दल (Shahu Chhatrapati Maharaj) आदर असेल तर त्यांना बिनविरोध करा’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूर : ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल, त्याबरोबरच आपण राहू. जो उमेदवार असेल त्याच्यासाठी जीवाचे रान करुन निवडून आणू’, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीकडून (Mahayuti) कोण उमेदवार दिला जाणार याबाबत मला माहिती नाही. मात्र जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावे लागेल. दुसरे काही करण्याचा आमचा स्वभाव नाही. आज तर आमच्या डोळ्यासमोर संजय मंडलिक हेच उमेदवार आहेत.’

‘मुश्रीफ यांना शाहू छत्रपतींबद्दल (Shahu Chhatrapati Maharaj) आदर असेल तर त्यांना बिनविरोध करा’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे, त्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘राजकारणामध्ये असे होत नसते. आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची त्या पाठीमागची भावना होती. मात्र, सतेज पाटील यांना इतका बालिशपणा कुठून आला, हे समजत नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court ची रेल्वेच्या 'सेकंड-क्लास पॅसेंजर' शब्दप्रयोगावर नाराजी; अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar: बाबा, दारू विकू नका; लेकीनं शपथ घालताच बापानं दुकानाला लावलं कुलूप, सुरू केला नवा व्यवसाय

Rohit Sharma Retirement: रोहितच्या निवृत्ती प्रकरणात मोठा ट्विस्ट! अगरकर-गंभीरवर BCCI नाराज? इनसाइड स्टोरी आली समोर,नेमक काय घडल ?

SCROLL FOR NEXT