Kolhapur Loksabha Election esakal
कोल्हापूर

Kolhapur Loksabha : कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागांबाबत तिढा कायम; महायुतीकडून मंडलिक, घाटगे, महाडिकांचं नाव चर्चेत

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आहेत; मात्र ही जागा भाजपने मागितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. या दोन्ही जागांबद्दल मुंबईत सातत्याने चर्चा सुरू आहेत, मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.

कोल्हापूर : भाजपने काल (बुधवार) लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. त्यात मात्र कोल्हापूर (Kolhapur) वा हातकणंगले मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे या दोन्ही जागांचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाकडे जाणार याची उत्सुकता त्यामुळे ताणली गेली आहे.

दुसरीकडे यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चलबिचलता आहे. महायुतीकडून (Mahayuti) संजय मंडलिक (Sanjay Mandlik), समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांची नावे कोल्हापूर मतदारसंघातून चर्चेत आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने, विनय कोरे, शौमिका महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आहेत; मात्र ही जागा भाजपने मागितली आहे. हातकणंगलेच्या जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे. या दोन्ही जागांबद्दल मुंबईत सातत्याने चर्चा सुरू आहेत, मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.

एका बाजूला भाजप समरजितराजे घाटगे यांना कमळ चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे उमेदवारी मलाच मिळेल आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते घेऊन निवडून येऊ, असा दावा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT