Kolhapur Crime esakal
कोल्हापूर

धक्कादायक! नाश्‍ता दिला नाही म्हणून पतीनं लोखंडी विळ्यानं वार करून पत्नीचा केला खून; मानेवर विळ्याचा वर्मी घाव

घरी सोप्यात सुशीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या उजव्या बाजूच्या मानेवर विळ्याचा वर्मी घाव बसला होता.

सकाळ डिजिटल टीम

सुशीला वेळेत नाश्‍ता घेऊन गेली नाही. यामुळे पती मारुती हाच राग मनात धरून सकाळी अकरापासूनच पत्नीला शिवीगाळ करीत होता.

नूल : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे उसाची लावण सुरू असलेल्या ठिकाणी वेळेत नाश्‍ता घेऊन आली नाही म्हणून पतीने मानेवर लोखंडी विळ्याने वार करून पत्नीचा खून केला. सुशीला मारुती बेळाज (वय ५०) असे मृत महिलेचे (Woman) नाव आहे. पोलिसांनी तिचा पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. तो पसार झाला आहे. सोमवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत गडहिंग्लज पोलिसांनी (Gadhinglaj Police) दिलेली माहिती अशी : बेळाजची शेती नाही. त्याने नूलमधील एका शेतकऱ्याची भागाने दोन एकर शेती केली आहे. याच शेतात सोमवारी सकाळपासून मारुती मजुरांना घेऊन उसाची लावण करीत होता. त्यावेळी सुशीला वेळेत नाश्‍ता घेऊन गेली नाही. यामुळे पती मारुती हाच राग मनात धरून सकाळी अकरापासूनच पत्नीला शिवीगाळ करीत होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मारुतीचा मुलगा बसवराज याने जनावरांचे दूध काढले. त्यानंतर ते डेअरीला घालण्यासाठी भावाकडे देऊन तो पत्नी सुप्रियाला सोबत घेऊन देवदर्शनासाठी बाहेर गेला.

दरम्यान, रात्री सव्वाआठच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या चन्नाप्पा बेळाजने बसवराजला फोनवरून ही माहिती दिली. तो तत्काळ मोटारसायकलने घरी आला. त्यावेळी घरी सोप्यात सुशीला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या उजव्या बाजूच्या मानेवर विळ्याचा वर्मी घाव बसला होता. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बसवराज बेळाज याने फिर्याद दिली. परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

मी सुशीलाला संपवले...

मारुतीला दारूचे व्यसन आहे. सायंकाळी सुशीला टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्यावेळी दारू पिऊन आलेल्या मारुतीने पुन्हा नाश्‍त्याच्या मुद्द्यावरून भांडण काढले. त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यावेळी रागाच्या भरात त्याने सोप्यातील विळा घेऊन तिच्या मानेवर वार केले. ‘मी सुशीलाला संपविले आहे,’ असे आम्हाला सांगून मारुती मागच्या शेतातून पसार झाल्याचे त्याच्या भाऊबंदाने पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT