कोल्हापूर

श्री परशुराम जन्मोत्सव भव्य - दिव्य करणार

CD

श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. १० मे रोजी होणाऱ्या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम हॉल येथे बैठक झाली. बैठकीत भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त मागीलवर्षी प्रमाणेच सोहळ्यात भगवान श्री परशुराम पालखी, झांज पथक, वारकरी संप्रदाय, लेझीम पथक, ब्राह्मण समाजातील संत, महात्मे, क्रांतिकारक, खेळाडू, इतिहासकार व सर्व क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांचे विविध फलक, व सजीव भूमिकेतून चित्ररथाचे नियोजन करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचा मार्ग बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा, गांधी मैदान मार्गे पेटाळा असा होईल. संध्याकाळी ७.१५ ला भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव, पाळणा, आरती, सुंठवडा वाटप व महाप्रसाद असे नियोजन केले आहे. तरी सहभागी होण्याचे व देणगीचे आवाहन ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, सारस्वत विकास महामंडळ, अखिल ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण बिझनेस फोरम, बहुउद्देशीय ब्राह्मण संघ, करवीर निवासिनी पुरोहित मंडळ, हक्कदार श्री पूजक मंडळ, परशुराम चषक क्रिकेट समिती, वेद चॅरिटेबल, ब्राह्मण जागृती सेवा संघ, मध्व ब्राह्मण संघ, सर्व हिंदुत्ववादी संघटना व इतर समस्त ब्राह्मण संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT