कोल्हापूर

मारहाणीतील जखमी तरूणाचा मृत्यू

CD

मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; सीपीआरमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : आपटेनगरमधील अपघातानंतर झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला विवेक बाळासाहेव शिंदे (वय २७, रा. माजगावकरनगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाइकांनी मारहाण करणाऱ्या संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. कारवाईस विलंब होऊ लागल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावरून बुधवारी रात्री सीपीआर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विवेक शिंदे हा १२ एप्रिलला सायंकाळी चारचाकी वाहनातून आपटेनगर परिसरात गेला होता. यावेळी जेसीबी मशीन आणि त्यांच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला होता. यावेळी जेसीबी मालकांसह तिघांनी विवेक शिंदेला बेदम मारहाण केली. जखमी विवेकवर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. प्रकृती अत्यावस्थ बनल्याने त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. उपचारादरम्यान २४ एप्रिलला विवेकचा मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT