कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्यात साडी वाटप तत्काळ करा

CD

gad102.jpg
गडहिंग्लज ः अंत्योदय लाभार्थींना साडी वाटप करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना दिले.
-------------------------------------------------
‘गडहिंग्लज तालुक्यात
साडी वाटप तत्काळ करा’
गडहिंग्लज, ता. १० ः ‘अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मेमध्येच साड्या पुरवठा विभागाकडे आल्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने त्यांचे वितरण झाले नाही. आता आचारसंहिता शिथील केल्याने तत्काळ साड्या वाटपाचे नियोजन करावे,’ अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख काशिनाथ गडकरी यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे.
अंत्योदय रेशन कार्डधारकांना दरमहा २० किलो गहू, १० किलो तांदूळ कमी दरात दिला जातो. याचा संबंधित कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे. वस्त्रोद्योग विभागातर्फे या कार्डधारकांना साडीही वितरणाचा निर्णय घेतला आहे. पाच वर्षे अंत्योदय कुटुंबप्रमुख महिलेला दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्यात येते. मेच्या पहिल्या आठवड्यातच पुरवठा विभागाकडे तालुक्यातील लाभार्थींच्या साड्या आल्या आहेत. त्या दुकानदारापर्यंत पोहोच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र लोकसभा आचारसंहितेमुळे साडी वाटप थांबले आहे. आता आचारसंहिता शिथील केल्याने तत्काळ साडी वाटप करावे, अशी मागणी केली.
काशिनाथ गडकरी, लक्ष्मण पाच्छापुरे, अमित कोरी, निखिल सुतार, सुभाष जरळी यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

Pune Solapur Highway: धाराशिव आगाराची एसटी बस ब्रेक फेल; ४० प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाने जीव धाेक्यात घातला, अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट येण्याची दाट शक्यता

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT