कोल्हापूर

बजरंग दल पोलिसांना निवेदन

CD

89636
‘अनधिकृत बांधकामची जागा
महापालिकेने ताब्यात घ्यावी’
कोल्हापूर, ता. ११ ः लक्षतीर्थ वसाहतीतील वादग्रस्त प्रार्थनास्थळीची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. न्यायालयाने बंदी घालूनही येथे शेड उभारण्याचा प्रकार झाल्याने संबंधितांवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्‍ववादी संघटनांतर्फे पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
लक्षतीर्थ वसाहतीतील गुंजुटे कॉलनीत प्रार्थनास्थळ आहे. विनापरवाना उभारलेल्या प्रार्थनास्थळावरील बांधकाम काही दिवसांपूर्वी उतरविले होते. यावेळी तणाव निर्माण झाल्याने न्यायालयाने येथील जागेवर जाण्यास मनाई केली होती. दरम्यान, या जागेवर पुन्हा अनधिकृतरित्या शेड उभारल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेला केली होती. तेथेच पुन्हा शेड उभारल्याने पुन्हा संघटनांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला. बुधवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन वादग्रस्त जागेची माहिती दिली. त्यांनी महापालिका आयुक्तांशी बोलून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दीपक देसाई, गजानन तोडकर, उदय भोसले, मनोहर सोरप, संदीप सासने, शिवानंद स्वामी, निरंजन शिंदे, अक्षय ओतारींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानजवळ व्यापारी जहाजावर हल्ला! अमेरिकेविरोधात संतप्त भारताचा मोठा निर्णय; US राजदूतांना निषेधपत्र जारी

ENG vs NZ, Test: जो रुट पुन्हा झाला कर्णधार! नाईटक्लब घटनेनंतर बेन स्टोक्ससह ऍटकिन्सनही इंग्लंड संघातून बाहेर

Umarga Crime : सावकारी जाचातून महिला फार्मसिस्टचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Narendra Modi: १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर पंतप्रधान मोदींचा भावनिक सूर! नेहरूंचा विक्रम मोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

काँग्रेसचा उमेदवार मॅनेज? कोट्यवधींच्या घोडेबाजाराचा आरोप, स्थानिक नेते संतप्त, दिवसभरात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT