कोल्हापूर

मुश्रीफ, शिवसेना बैठक जिल्हाधिकारी कार्यालय

CD

फोटो- 95029

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर उपाय काढा
पालकमंत्री हसन मुश्रीफ : निधी असूनही अमृत योजना रखडणे अक्षम्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : अमृत योजनेचे काम निधी असून, रखडणे ही अक्षम्य बाब आहे. शहरासह जिल्ह्यात गांजा विक्री खुलेआम होत आहे. खून होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यस्था राहिलेली नाही, त्यावरही उपाय काढा, अशा सूचना आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. तसेच नागरी सुविधांपासून नागरिक वंचित राहत आहेत. याप्रश्‍नावर चर्चा केली नाही तर शिवसेना ठाकरे गटाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून जाब विचारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शहरातील गांजा विक्रीमुळे नशा वाढत आहे. त्यातून खुनासारख्या घटना घडत आहेत. ‘रिल्स’मुळे खून होत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याचवेळी शहरातील अमृत योजनेचा निधी २०१८ला येऊनही कामे पूर्ण झालेली नाहीत. नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप केला. रस्ते, पाणी, आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली. यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना उपाय करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावरही पदाधिकाऱ्यांनी टीका केली. यावेळी त्यांनाही पालकमंत्र्यांनी समज दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे यांनी यावेळी मते मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT