कोल्हापूर

सरवडे

CD

03444, 03445

विठ्ठलराव खोराटे,आनंदी पाटील
...

राधानगरी तालुका संघाच्या
चेअरमनपदी विठ्ठलराव खोराटे

सरवडे : राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी विठ्ठलराव शिवाजीराव खोराटे यांची तर व्हाईस चेअरमनपदी आनंदी केरबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राधानगरी तालुका संघाची स्थापना २४ डिसेंबर १९५५ झाली. संघाच्या स्थापनेपासून निवडणूक झाली नव्हती. परंतु यावर्षी दोन आघाडीत निवडणूक झाली. या निवडणुकीत विठ्ठलराव खोराटे व वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १५ जागा मिळविल्या. शनिवारी(ता.२९) संघाच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची सभा झाली. अध्यक्षस्थानी राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख होते. संघाचे व्यवस्थापक एकनाथ पाटील यांनी स्वागत केले. विठ्ठलराव खोराटे यांचे नाव ज्येष्ठ संचालक श्रीकांत साळोखे यांनी सुचवले तर संचालक सर्जेराव बुगडे यांनी अनुमोदन दिले. आनंदी पाटील यांचे नाव दत्तात्रय धनगर यांनी सुचवले. शुभम पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक वसंतराव पाटील, विलास एरूडकर ,बंडा पाटील, राजाराम देवर्डेकर, जालंदर पाटील, मधुकर कांबळे , लहू गुरव , वैशाली पाटील आदी उपस्थित होते. शिवराज खोराटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: डीसीपींनी गुंडाला धो-धो धुतला! कल्याणच्या ‘सिंघम’ची धडक कारवाई; व्हिडीओ व्हायरल

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

SCROLL FOR NEXT