कोल्हापूर

वारणा दूध संघात दैनंदिन जीवनशैली व ताणतणाव या विषयावरती मार्गदर्शन

CD

23B04135
सकारात्मक दृष्टिकोनातून समस्या सोडवा
डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर ः वारणा दूध संघात मार्गदर्शन
-----
वारणानगर, ता. ४ : ‘‘दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या आरोग्यविषयी, शारीरिक, मानसिक, वैचारिक समस्या यांचा सूक्ष्मपणे विचार करून जीवनशैलीत योग्य बदल करा. स्वतःला आनंदी ठेवा. स्वतः वरती प्रेम करा.जीवन जगताना समस्या या येतातच हे गृहीत धरून समस्येचे योग्य पृथक्करण करून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य व आहाराविषयी जागृत जीवनशैलीचा अवलंब करा, असे मत तज्ज्ञ न्यूरॉलॉजिस्ट डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर यांनी येथे व्यक्त केले.
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा दूध संघात डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर ‘दैनंदिन जीवनशैली व ताणतणाव’विषयी बोलत होते. डॉ. औरंगाबादकर म्हणाले, ‘तणावविरहित आयुष्य जगण्यासाठी सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा. व्यसनांपासून दूर राहा. वाचन, चालणे, पोहणे यासारख्या गोष्टींचा जीवनशैलीत अवलंब करा. पुरेशी झोप घ्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी कामाच्या पूर्ततेसाठी सकारात्मक गोष्टींचा आवश्यक तेवढा ताण घेण्यास हरकत नाही.’ कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी मोरे, अभिजित पाटील, शिवाजी कापरे, प्रदीप देशमुख, महेंद्र शिंदे, राजवर्धन मोहिते, माधव गुळवणी, व्ही. टी. पाटील, के. आर. पाटील, एन. आर. पाटील, अरुण पाटील, अकौंट मॅनेजर सुधीर कामेरीकर यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT