कोल्हापूर

पेरणीपूर्व मशागतीला आवळी परिसरात वेग

CD

पेरणीपूर्व मशागतीला
आवळी परिसरात वेग

आवळी बुदुक , ता . १५ : पावसाळी पिकांसाठी पेरणी करण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आवळीसह परिसरात वेग आला आहे. आठवड्याभरावर आलेल्या रोहिणी नक्षत्रात भात पिकासाठी धूळवाफ पेरणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची शेतीकामांची सर्वत्र मोठी धांदल उडाली आहे.
राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागात चक्रेश्वरवाडी, बारडवाडी, पिंपळवाडी, आवळी बुद्रुक, आमजाई व्हरवडे, सिरसे, भोपळवाडी आदी गावांतील शिवारात पावसाळी पेरणीपूर्व शेतीकामांनी गती घेतली आहे. शिवारासह प्रामुख्याने जिरायती क्षेत्रातील माळरानावरील शेतीत सध्या पॉवर टिलर किंवा मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटीची कामे करताना शेतकरी दिसत आहेत. काही तुरळक ठिकाणी बैलांच्या औतानेही शेतात नांगरटी केली जाताना दिसत आहेत. किंबहुना ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील नांगरटीची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे शेतीला बांध घालणे, ढेकळ फोडणे, धसकटे, पालापाचोळा पेटवणे आदी कामे सुरू आहेत. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुलेही कुटुंबीयांना शेतीकामाला हातभार लावताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची मिश्र सुरुवात! युद्ध समाप्तीच्या संकेतांनी बाजाराला दिलासा; मात्र या सेक्टरवर दबाव वाढला

India Bangladesh Diesel Supply : युद्धामुळे जगावर इंधनाचे संकट, तरीही भारताने बांगलादेशला पाठवले ५००० टन डिझेल; नेमकं कारण काय ?

Latest Marathi News Live Update : मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांची कुपर रुग्णालयाला भेट

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

SCROLL FOR NEXT