treatment structure on corona virus infected patients 
कोल्हापूर

कोरोना बरा होतो ; पण...

शिवाजी यादव

कोल्हापूर - वसंताला ताप, तीव्र घसादुखीसह काही लक्षणे होती म्हणून शासकीय रुग्णालयात त्याने तपासणी केली. पुढे स्वॅब घेतला आणि दोन दिवसांत तो कोरोना पॉझिटिव्ह आला. पुढे १४ दिवस शासकीय रुग्णालयातील खाटावर उपचारासाठी पडावे लागले. नियमित उपचारांचे डोस घेत डॉक्‍टरांची प्रत्येक सूचना पाळून तो कोरोनामुक्त झाला. मी काळजी घेतली नाही म्हणून कोरोनाग्रस्त झालो, पुढे घालमेल अनुभवली. किमान तुम्ही तरी घरीच थांबा, असा त्याच्या नजरेचा इशारा आता बोलका ठरत आहे.

  नाना शंका अनेकांच्या मनात

कोरोनावर नेमके काय उपचार होतात, किती दिवस रुग्णालयात थांबावे लागते. तो कोरोनामुक्त होतो म्हणजे काय होतो. अशा नाना शंका अनेकांच्या मनात आहेत. अशी कोरोनामुक्त झालेली वरील एक प्रातिनिधीक व्यक्ती व त्याच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर यांच्याकडून कोरोना उपचारांचा वेध घेतला तेव्हा कोरोना नक्की बरा होऊ शकतो; मात्र तो होऊच नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी एकमेकांपासून दूर रहाणे आवश्‍यक असल्याचा सूर निघाला.  

डॉ. अनिता सैबन्नावर म्हणाल्या, ज्यांची कोरोना तपासणी होते, त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. ज्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह येतो त्यांना हॉस्पिटलमधील कोरोना उपचार कक्षात दाखल केले जाते. यात नियमित व तीव्र कोरोना असे दोन प्रकारचे कोरोनाग्रस्त आहेत. त्यांच्या लक्षणावर पाच दिवसांत उपचार होतात. त्यानंतर मल्टीव्हिटॅमीन दिले जाते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते.

प्रत्येक अवयवाच्या लक्षणानुसार औषधे

काही कोरोनाग्रस्तांना न्यूमोनिया व कोरोनाचीही लक्षणे असतात, कधी काहींना श्‍वसनाचा त्रास तीव्र होतो. त्यांना गरजेनुसार ऑक्‍सीजन दिला जातो, तर कधी काहींना गुंतागुतींच्या मधुमेह किंवा अन्य आजारांची लक्षणे असतात, त्यांना कोरोना झालेला असतो. कधी त्यांच्या अवयवांना धोकाही पोचलेला असतो. त्यांच्या प्रत्येक अवयवाच्या लक्षणानुसार औषधे दिली जातात. कधी त्यांचा कोरोना बरा होण्यास विलंबही होऊ शकतो.वरील १४ दिवसांच्या काळात तर दोन तासाला त्यांना वेगवेगळ्या कुशीवर किवा पोटावर झोपण्यास सांगण्यात येते. ठराविक वेळेला जेवण दिले जाते. वॉर्डातून पायी चालायला लावले जाते. व्हिटॅमिनचा डोस गरजेनुसार दिला जातो. याकाळात त्यांना फारसा ताण येणार नाही, याची काळजी घेतली जाते.’’

बहुतांशजण कोरोनातून बरे होतात. मात्र, ज्यांना गुंतागुंतीच्या आजारांची लक्षणे आहेत, तीव्र स्वरूपाचा कोरोना झाला आहे, अशांची प्रकृती गंभीर होते, असेही दिसते.
- डॉ. अनिता सैबन्नावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर हायवेने प्रवास करताना सावधान! प्रत्येक 5 किलोमीटरवर बसवले स्मार्ट कॅमेरे; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

Latest Marathi News Live Update : होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, ३ भारतीयांचा मृत्यू

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT