Vaccinated 2400 People In Kowad Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोवाडला 12 दिवसांत 2400 जणांना लस

अशोक पाटील

कोवाड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 च्या लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणासाठी जनजागृती केली जात असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त 12 दिवसांत 30 गावांतील 2400 लोकांना लस दिल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रसन्न चौगुले यांनी दिली. 

कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्‍याच्या पूर्व भागातील मोठे आरोग्य केंद्र आहे. 30 गावांचा आरोग्य केंद्रांतर्गत समावेश होतो. प्रत्येक उपकेंद्रातून लसीकरणासाठी लोकांत जनजागृती केली जात आहे. 45 ते 59 या वयोगटातील नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासह आजार असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना लस दिली जात आहे. तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने लस दिली जात आहे.

आधार कार्डच्या आधारे लाभार्थ्यांची नोंदणी करून लस दिली जात आहे. लसीकरणाची मोहीम शिस्तबद्ध व्हावी व गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गावाला दिवस ठरवून दिले आहेत. त्या त्या गावांतील लोकाना दवंडी देऊन लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक शिक्षकही लस घेत आहेत.

आरोग्य केंद्रात नोंदणी, लसीकरण, देखरेख व मार्गदर्शन असे स्वतंत्र विभाग तयार केले आहेत. त्यानुसार लसीकरणाचे काम सुरू असल्याचे डॉ. चौगुले यांनी सांगितले. लसीकरणाच्या कामात आतापर्यंत कोणतीही अडचण आली नसून लोकांतून समाधान व्यक्त केले जात असल्याचे डॉ. चौगुले यांनी सांगितले. लसीकरणाच्या कामात आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य मिळत आहे. 

आरोग्य केंद्राकडे पहिल्या टप्प्यात 2600 लस प्राप्त झाल्या होत्या. केवळ 12 दिवसात 2400 लोकांना लस दिली आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाधिक लोकाना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा तयार ठेवली आहे. त्यामुळे लाभार्थींनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. 
- डॉ. प्रसन्न चौगुले, वैद्यकीय अधिकारी, कोवाड 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : पुण्यात दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT