कोल्हापूर

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजी राजे छत्रपतींना अटक करा! विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा पेटला; मुस्लिम समाजाची मागणी

Sambhaji raje chhatrapati News : गेल्या काही दिवसांपासून शाहुवाडीतील किल्ला विशाळगडावरील बेकायदेशीर आतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

रोहित कणसे

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शाहुवाडीतील किल्ला विशाळगडावरील बेकायदेशीर आतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांना आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर काल विशाळगड परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता संभाजी राजेंना अटक करा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.

विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडी बद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांना अटक करा अशी मागणी देखील करण्यात येत आहे. यासंबंधीचे निवेदन देखील मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी गडावर सोडले नाही, यावेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. तसेच गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलथून टाकल्या होत्या. यावेळी स्थानिकांनी त्यांना मारहाण झाल्याचा तसेच घरांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला होता.

विशाळगडावर सुमारे १५८ अतिक्रमणे आहेत. यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे ही न्यायालयीन वाद असलेली अतिक्रमणे सोडून अन्य अतिक्रमणे काढावीत, यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात

काल झालेल्या या प्रकारानंतर अखेर विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळगडावर दाखल झाले असून जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहचले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT