Warning to cancel the certificate of doctors who do not open hospitals in case of an emergency 
कोल्हापूर

....तर त्या डॉक्टरांची सनद रद्द करणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - संपूर्ण जिल्ह्यत कोरोनाने थैमान घातले आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना जिल्ह्यातील बहुतांश खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे सरकार दावाखण्यावर मोठा ताण येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जे दवाखाने उघडणार नाहीत अशा डॉक्टरांची सनद रद्द करण्याचा इशारा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार बैठकीत दिला.

यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील,  महिला बालकल्याण सभापती डॉक्टर पद्मा राणी पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाज कल्याण सभापती स्वाती सासणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, राजेश पाटील उपस्थित होते.

उपाध्यक्ष पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू ठेवले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांचे लोंढे लागले आहेत. त्यामुळे एकेका आरोग्य केंद्रात 250 ते 300 इतके बाह्य रुग्ण दाखल होत आहेत.यातच ग्रामीण भागातील बहुतांश खाजगी दवाखाने बंद आहेत, त्यामुळे सरकारी यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे म्हणाले की, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक साधन सामग्रीची खरेदी होत असून त्याचा पुरवठा होत आहे. जवळपास 14 हजार कर्मचारी या कामात गुंतले आहेत. त्यांना सुरक्षेची साधने पुरवण्यात येत आहेत. वडगाव येथे को रोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरातील सर्व गावांमध्ये औषध फवारणी केली आहे. तसेच दररोज सर्व गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT