women protest on bajaj finance office kolhapur 
कोल्हापूर

Video - ब्रेकिंग - महिलांनी फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना काळं फासून काढली धिंड  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून कर्ज वसुलीसाठी अश्लील भाषा वापरल्याच्या निषेधार्त संतप्त झालेल्या महिलांनी बजाज कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या महिलांनी कर्मचाऱ्यांना काळे फासत त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. छत्रपती महिला शासन या संघटनेच्यावतीने दिव्या मगदुम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या तोंडाळा काळे फासल्यामुळे यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवसूलीसाठी काल एका महिलेच्या घराला कुलूप लावले होते. याच रागातून संतप्त महिलांनी शाहूपुरी परिसरातील कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना काळे फासले. तसेच कार्यालयाच्या साहित्याचे नुकसान केले. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरुषांससह महिलांना ताब्यात घेतले. यावेळी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.

 दरम्यान, यावेळी कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यामुळे दोन्ही बाजुंनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे शाहुपूरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 

व्हिडिओ पाहा - 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT