youth in Sajani was positive on the first day and negative on the second day 
कोल्हापूर

साजणीतील 'तो' युवक पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह तर दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह...

सागर कुंभार

रुकडी - साजणी (ता.हातकणंगले) येथील 'तो' युवक बुधवार (दि.८) रोजी पॉझिटिव्ह तर पुन्हा गुरुवारी (दि.९) रोजी निगेटिव्ह आल्याने साजणी करांचा जीव भांड्यात पडला आहे.

दरम्यान,इचलकरंजी येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेला व विलगीकरण कक्षात असणारा साजणी (ता.हातकणंगले) येथील २५ वर्षीय युवकांस कोरोनाची लागण झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते.साजणी हे गाव इचलकरंजी शहरा नजीक आहे.हा युवक इचलकरंजी  येथील गारमेंटमध्ये कार्यरत आहे.सदर युवक ज्या गारमेंटमध्ये कार्यरत होता तिथे त्याचे दोन सहकारी कोरोना बाधित होते.त्यांच्या संपर्कात हा युवक आल्याने त्याला इचलकरंजी येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यावेळी 'त्या'  युवकाचा स्वॅब घेतला असता तपासणी अहवाल बुधवार (दि.८) रोजी रात्री उशीरा पाॅझिटिव्ह आला होता.त्यामुळे त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तात्काळ दाखल केले होते.

यावेळी त्याचा पुन्हा स्वॅब घेतला असता गुरुवार (दि.९) रोजी तो निगेटिव्ह आला. दरम्यान, साजणी येथे हा युवक राहात असलेला भाग बंद करुन तात्काळ औषध फवारणी करण्यात आली आहे .या युवकाच्या संपर्कातील त्याचे आई,वडील व भाऊ यांना इचलकरंजी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरून न जाता मास्क,सॅनिटायजर चा वापर करावा तसेच कोणीही विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन कोरोना दक्षता  समिती साजणीच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT