The land near Krishna river began to be eroded by the rains, the pumps were washed away 
पश्चिम महाराष्ट्र

कृष्णाकाठी पावसाने जमीन ढासळू लागली, पंप गेले वाहून

सतीश तोडकर

भिलवडी (जि . सांगली)  : परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत. 

परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली. सततचा पाऊस व नदीतील वेगाच्या प्रवाहाने काठावरील जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. त्यामुळे काठचे असंख्य कृषी पंप पाण्यात वाहून गेले आहेत. 

परिसरात दरम्यान त्याच्या जोडण्या, सक्‍शन पाईप, वीजपेट्याही गेल्या आहेत. खालचे जमिनीचे भाग तुटून गेल्याने बांधलेली केबिन ढासळली आहेत. काही ठिकाणी तर त्यांचा नामोशिशानही राहिला नाही. पाणी पातळी उतरू लागताच आणखी नुकसानीची भीती आहे. पावसामुळे शेत शिवारात पाणी साठले आहे. पिके कुजू लागली आहेत. उभी पिके आडवी झाली आहेत. नव्या ऊस लागणीची अक्षरश: वाट लागली आहे.

गतवर्षीच्या प्रलयकारी महापुरात नदीकाठी प्रचंड मोठे नुकसान झाले. शेकडो कृषिपंप वाहून गेले, मातीखाली गाडले, काठावरील विजेचे खांब उन्मळून पडले. पिके गेली, जमिनी खचल्या. त्यातून आता कुठे शेतकरी सावरतोय तोच या अस्मानी संकटाने शेतकरीवर्ग पुरता गारद झाला आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : १९ वर्षीय समीक्षाने तयार केलेली जर्सी घालून राजस्थान रॉयल्स खेळणार! जाणून घ्या त्या मागची स्पेशल स्टोरी

सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडिया कायदा येणार?

RR vs GT Live : यशस्वी जैस्वाल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार! रियान पराग संघाबाहेर का? व्हॅपिंग प्रकरण भोवले की आणखी काही?

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT