leopards are moving freely in the western part of Shirala; Frequent attacks on animal sheds 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा पश्‍चिम भागात बिबटे मोकाट... जनावरांच्या शेडवर होतायत वारंवार हल्ले

हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी (जि. सांगली)  : शिराळा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग विशेषतः डोंगररांगांच्या परिसरांनी वेढलेला आहे. डोंगररांगांच्या अतिजवळ परिसरात विशेषतः शिंदेवाडी, मोरेवाडी, बेलेवाडी, दुरूंदेवाडी, कुसाईवाडी, धसवाडी, बेलेवाडी, चिंचोली-मोरेवाडी, रिळे, मांगरूळ, बिळाशी, पावलेवाडी, अस्वलेवाडी, मांगरूळ, रिळे, फुपेरे, पुनवत आदी गावे येतात. 

जंगलात वास्तव्य करणारे बिबट्यांचा आता मानवी वस्तीतही संचार होऊ लागला आहे. बुधवारी (ता. 10) रिळे (ता. शिराळा) येथील शेतकरी आनंदा नाथा पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांना ठार, तर एक जखमी केली होती. त्याच दिवशी मध्यरात्री "पुनवत' येथील शिवाजी अनुसे यांच्या शेतात बसण्यास आलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला करून शेळी ठार केली होती. गुरुवारी (ता. 11) रिळ्यातीलच शेतकरी सर्जेराव नाना पाटील यांच्या जनावरांच्या शेडवर बिबट्याने हल्ला करून एक गाबण शेळी, दोन बोकडांना ठार केले होते. 

सोमवारी (ता. 16) मध्यरात्री मांगरूळ (ता. शिराळा) येथील खांडेकर-शेणवी वस्ती परिसरात शेतकरी श्रीरंग ढगू खांडेकर यांच्या जनावरांच्या वस्तीवर पहाटे बिबट्याने हल्ला करून "खिलार गाईचे' दीड वर्षाची कालवड जागीच ठार केली आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, रेडी, कालवडीचा पंचनामा वनविभागाचे पदाधिकारी जागेवर जाऊन करत असले; तरी वनविभागाकडून मिळणारी भरपाई तुटपुंजी अशीच आहे.

शिराळा पश्‍चिम भागात बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन, त्यांचे हल्ले यांची वन्यजीव विभागाने गांभीर्याने दखल घेऊन मोकाट असणारे बिबटे, होणारे हल्ले याबाबात ठोस उपाययोजनाच करणे गरजेचे आहे. 

वनविभाग सुस्त? 
बिबट्याचे ज्या परिसरात दर्शन होते, त्या विभागात वनविभागाच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणतीच ठोस उपाययोजना करता येत नाही. त्यामुळे वनविभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांचे विशेष गांभीर्य जाणवत नाही, असेच चित्र सध्या आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात चाललंय काय? आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार; कौटुंबिक, व्यावसायिक संबंध ठेवण्यास बंदी

IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा

2,20,00,00,000 इतकी आहे सनी देओलची संपत्ती, मुंबईपासून UK पर्यंत आहेत आलिशान घरं, 100 एकर जमीन आणि बरंच काही

भाईला 'बाई' करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

SCROLL FOR NEXT