पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics: उपसरपंच पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग; वाळवा तालुक्यातील चित्र

Sangli Politics: सरपंचपदाचे सहा महिने पुर्ण झालेल्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणून सर्वपक्षीय आघाडीतील बलवान घटक पक्ष असलेला गट आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपणच किंग असल्याचे दाखवून देवू शकतो.

शिवकुमार पाटील

Sangli Politics: गतवर्षी जिल्ह्यातील ६९२ ग्रामपंचयतीच्या निवडणुका झाल्या. सरपंचपदाची थेट निवडणुक झाल्याने निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांनी सुचविलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्याला निवडून आणावे लागले. परिणामी अति महत्वकांक्षी असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या मनाला मुरड घालावी लागली.

मात्र निवडणुकीपासून गटातटाच्या राजकारणात उपसरपंच या पदाला विशेष महत्व आले आहे. सरपंच नाही, निदान सरपंचाबरोबरीच्या खुर्चीत बसता यावे. प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे नेते यांच्या समोर तोऱ्यात मिरविता यावे यासाठी अति महत्वकांक्षी नेते आता उपसरपंचपदासाठी आतुर झाले असल्याचे दिसतेय.

तालुक्यातील गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी काही गावात दरवर्षी वर्षी तर काही गावात दोन वर्षासाठी उपसरपंच करण्याचे नियोजन शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लेखी करार करून तर काही गावात बेल भंडारा उचलून आणाभाका घेवून फायनल केले आहे.

त्यामूळे नजीकच्या काळात तालुक्यात उपसरपंच पदाचे राजीनामे आणि निवड हा विषय चर्चेचा असणार आहे. ज्या गावात एक पक्षीय सत्ता आहे अशा ठिकाणी अडीच वर्षाच्या अटीवर दोन उपसरपंच 'पाहायला मिळणार आहेत. तर सर्व पक्षीय आघाड्या असलेल्या गावात पाच वर्षात कदाचित पाच उपसरपंच पाहायला मिळणार आहेत. तसे नियोजन होवूनच आघाड्या अस्तित्वात आल्या आहेत.

सरपंचपद हे लोक नियुक्त असल्याने किमान सहा महिने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव संमत करता येत नाही. तथापी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी जिथे अविश्वास प्रस्ताव आणण्याइतपत बहुमत आहे. अशा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे सहा महिने पुर्ण झालेल्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणून सर्वपक्षीय आघाडीतील बलवान घटक पक्ष असलेला गट आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपणच किंग असल्याचे दाखवून देवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT