पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात शाळा, महाविद्यालयात मास्क वापरणे सक्तीचे

कोरोनाचे नियमांचे पालन करत शाळेच्या विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती केली

मिलिंद देसाई

बेळगाव : येणाऱ्या काळात शालेय विद्यार्थ्यांना सातत्याने मास्क वापरावा लागणार आहे. शिक्षण खात्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होईल तोवर विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती करण्याचा विचार सुरू केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नसताना पास करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. परीक्षा पुढे गेल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.

शिक्षण खात्याने 15 जूनपासून 2021- 22 शैक्षणिक वर्षाला सुरुवात होईल अशी माहिती दिली होती. मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अधिक विलंब होणार आहे. सलग वर्षभर शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. सहावी ते दहावीच्या शाळा सुरू करण्यास अधिक विलंब होऊ नये याची दखल शिक्षण खाते घेणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत शाळेच्या विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती केली जाणार आहे.

जानेवारी महिन्यापासून शाळा सुरू करण्यात आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचे पालन केले. मास्कचा वापर आणि दररोज थर्मल स्कॅनिंग केले जात होते. काही दिवसांनी पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. याची दखल शिक्षण खात्याकडून घेतली जाणार आहे. त्यामुळेच सर्व शाळा, महाविद्यालयात मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

"सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र संसर्ग कमी होताच पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करावा याबाबत जनजागृती केली जाणार आहे."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT