deepak pawar.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ऐकावे ते नवलच.....दृष्टी आली नाही तर या डोंगरावरून उतरणारच नाही...पाच वर्षापासून मायलेक डोंगरावरच 

प्रसाद पाटील

येडेनिपाणी (सांगली)- तारूण्याकडे वाटचाल करत असतानाच त्याची दृष्टी गेली. दिसायचे पूर्ण बंद झाले. त्यानंतर त्याने येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मल्लिकार्जुन तथा महादेवाचा डोंगर गाठला. गेल्या 5 वर्षांपासून तो येडेनिपाणी (ता.वाळवा) येथील मल्लिकार्जुन डोंगरावर आई समवेत राहत आहे. दृष्टी आल्याशिवाय डोंगर सोडायचा नाही असे म्हणून मायलेक डोंगरावरच राहतात. सांगली शहरातील अंध तरुण दीपक बाळू पवार याची कहाणी आहे. मायलेकाचा हा अंधविश्‍वास परिसरातील नागरिकांचा उत्सुकतेचा विषय बनला आहे. 

दीपकचे सध्या वय 27 असून शिक्षण 11 वी पर्यंत सांगलीत झाले असून सन 2005 सालापासून इयत्ता सातवीमध्ये असताना त्याला डोळ्याने दिसायचे बंद झाले. काही दिवस त्याच्या कुटुंबाने उपचारासाठी दवाखान्यात उपचार घेतले मात्र निदान काय सापडले नाही. तसेच घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुढे उपचार घेणे परवडणारे नव्हते. त्याचे कुटुंबीय सांगलीत सेंट्रिंगचे काम करत आहे. दीपकला भविष्यात चांगले करीअर करण्याची इच्छा होती. मात्र नियतीने त्याच्या जीवनावर घाला घातलाय.

आपले डोळे परत यावेत ही श्रद्धा मनात धरून आई सोबत मल्लिकार्जुन डोंगरावर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येताना त्यांनी निश्‍चिय केला आहे, जो पर्यंत दृष्टी येत नाही तोपर्यंत मागे फिरकायचे नाही. मंदिराच्या पुजाऱ्यांना शक्‍य होईल तेवढी मदत हे दोघे येथे राहून करत असतात. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान तथा महादेवाच्या आशीर्वादाने दृष्टी पुन्हा येईल अशी श्रद्धा या मायलेकरांच्या मनात आहे.

विज्ञानाने आपण जरी पुढे गेलो असलो तरी आजही आपल्या देशात अंधश्रद्धेने लोकांना ग्रासल्याचे यावरून दिसून येत आहेत. दिपकला सध्या गरज आहे ती नेत्र तज्ज्ञ सल्ला आणि उपचाराची. मात्र श्रद्धा असल्यामुळे त्यांनी येथून परत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीत यशवंतनगरमध्ये त्याचे कुटुंब राहत असून महिन्यातुन 1-2 वेळा येथे येऊन शिधा देऊन जातात. सध्या लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने त्यांना येणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना शिधा देऊन मदत केली आहे. 

मी अनेक ठिकाणी उपचार घेतले मात्र कोणतेही निदान सापडले नाही. जोपर्यंत माझ्या डोळ्यास दृष्टी येत नाही तोपर्यंत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवाची सेवा बजावत येथेच राहण्याचा माझा निर्णय आहे." 
-दीपक पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT