baramati municipal  sakal media
पश्चिम महाराष्ट्र

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा

बारामती : राज्य मंत्रीमंडळाने (mva Government) काल घेतलेल्या नगरपालिकेच्या निर्णयानंतर आता बारामतीत नगरपालिका निवडणूकीची (Baramati municipal election) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या (election postponed) नाही तर डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी (political preparations) सुरु केली आहे.

बारामती नगरपालिकेची आगामी निवडणूक एका प्रभागात दोन नगरसेवक या पध्दतीने होणार आहे हे आता जवळपास निश्चित झाले आहे. बारामतीतील प्रभागरचना विचारात घेता दोन नगरसेवक संख्या असलेले 18 व तीन नगरसेवक संख्या असलेला एक असे 19 प्रभाग बारामतीत होतील अशी शक्यता आहे. बारामतीत नगरसेवकांची संख्या निवडून येणारे 39 व स्वीकृत चार अशी 43 इतकी असेल, तर नगराध्यक्ष नगरसेवक निवडतील अशीच चिन्हे आहेत.

पन्नास टक्के महिलांचे आरक्षण विचारात घेता महिला नगरसेवकांची संख्या 20 असल्याने महिलांमध्येही नगरसेवक पद प्राप्त करण्यासाठी चुरस होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण 27 टक्क्यांपर्यंत ठेवण्यास व एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेची आरक्षण रचना कशी असेल या बाबत स्पष्टता नाही. मात्र तरीही इच्छुंकानी तयारी सुरु केलेली आहे.

दरम्यान नगराध्यक्ष नगरसेवकातूनच निवडून देण्याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकच नगराध्यक्ष निवडण्याचीच शक्यता जास्त आहे. बारामती नगरपालिका आता अ वर्ग नगरपालिका आहे. येत्या काळात नगरपालिकेत आणखी तीन गावे समाविष्ट होणार आहेत, या पार्श्वभूमीवर नगरसेवक पद प्राप्त करण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

"विद्यमान नगरसेवकांसह नवीन कार्यकर्तेही यंदा संधी मिळावी या साठी आता तयारीला लागले आहेत. बारामतीत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असते, यंदाही पक्षचिन्हावर निवडणूक लढविली जाईल अशीच शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच या बाबत अंतिम निर्णय घेतील हेही स्पष्ट आहे."

- मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT