school 
पश्चिम महाराष्ट्र

उपेक्षितांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात !

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे (जि. नगर) : उपेक्षितांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समनापूर ( ता. संगमनेर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी सामुहिक प्रयत्न केले. सप्ताहभर सर्वेक्षण करून शिक्षकांनी सुमारे शंभरहून अधिक शाळाबाह्य मुले शोधली. आता या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून हंगामी शिक्षण दिले जात आहे.

संगमनेर येथील थोरात साखर कारखान्याच्या उसतोडणीसाठी दूरवरून ऊसतोडणी कामगार आपल्या लेकराबाळांसह समनापूर ( ता. संगमनेर ) परिसरात दाखल झाले आहे. मुख्याध्यापिका सुनंदा डोखे, शिक्षक किरण खैरनार, प्रकाश मधे, शिक्षिका उषा पाळंदे, सुरेखा कर्पे, राजश्री कथले, सुरेखा सहाणे, अर्चना मोरे, शोभना बोरसे, कुमार कोरडे, अनिता गोडगे यांनी ऊसतोडणी कामगारांच्या रहिवासी अड्डे, विटभट्टी, भटक्यांच्या राहूट्यावर जावून शाळाबाह्य मुलांचा शोध घेत सर्व्हेक्षण केले. ही मुले आई - वडिलांच्या मागे उसाच्या फडात, राहुट्यांवर भटकत असायची. त्यातून सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शोधण्यात शिक्षकांना यश आले. पालकांचे व त्यांच्या मुलांचे शिक्षकांनी समुपदेशन केले. त्यामुळे उपेक्षितांची मुले समनापूर येथील प्राथमिक शाळेत येवून शिक्षणाचे धडे गिरवू लागली. या मुलांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. शाळाबाह्य, हंगामी स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करुन वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी केलेले सामुहिक प्रयत्न कौतुकास पात्र ठरले आहे.

संगमनेर भागात दरवर्षी दूरवरून उसतोडणी व वीटभट्टी कामगार येतात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातून शंभरहून अधिक शाळाबाह्य मुले शोधण्यात यश आले.
- किरण खैरनार ( शिक्षक ) प्राथमिक शाळा, समनापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT