Sitaram Temple Sadalga Chikkodi esakal
पश्चिम महाराष्ट्र

RSS-BJP कार्यकर्त्यांना नदी काठावर स्वच्छता करताना सापडले पुरातन मंदिर; 'सीताराम मंदिर' असल्याचा केला दावा!

आरएसएस (RSS) व भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या स्वच्छता अभियानात हे मंदिर आढळले.

सकाळ डिजिटल टीम

मंदिर स्वच्छतेपूर्वी गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मते हे सीताराम मंदिर असून तेथे माती खोदाई करून काढल्यास ते सापडेल, असे सांगितल्याने कार्यकर्त्यांनी ते मंदिर शोधल्याचे सांगितले जाते.

सदलगा : येथे नदीच्या जॅकवेल रस्त्यावर मातीखाली दबलेले पुरातन मंदिर स्वच्छता अभियानावेळी सापडले. आरएसएस (RSS) व भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या स्वच्छता अभियानात हे मंदिर आढळले. याचे पुरातन नाव सीताराम मंदिर (Sitaram Temple) असल्याचे सांगितले जाते.

सदलगा येथे हे जुने मंदिर आहे. अलीकडे नदीकाठावर पाणी येऊन ते मंदिर मातीखाली दबले होते. याची स्वच्छता करण्याचे ठरवून कार्यकर्त्यांनी ती केली. यावेळी नूतन मंदिर खोदाईत सापडले अशी अफवा उठल्याने त्याची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात ही स्वच्छता मोहिमेत या मंदिराची स्वच्छता झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

मंदिराच्या नावावरून वेगवेगळे तर्क बांधले जात आहेत. त्याबाबतही आणखी माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांनीही भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

मंदिर स्वच्छतेपूर्वी गावातील ज्येष्ठ मंडळींच्या मते हे सीताराम मंदिर असून तेथे माती खोदाई करून काढल्यास ते सापडेल, असे सांगितल्याने कार्यकर्त्यांनी ते मंदिर शोधल्याचे सांगितले जाते. सोमवारी स्वच्छता केली असून मंदिरात पादुका असल्याचे सांगितले जाते. भाजपचे मंडल अध्यक्ष संजय पाटील, अतिक्रांत पाटील, कुमार सकपाळे, भूषण खोत, बाळू उगारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT