Robotic School in Sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

रांजणीच्या तरुणाची रोबोटिक शाळा; मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी मशीन लर्निंग, कोडिंगचं प्रशिक्षण

रांजणी येथील प्रद्युम्न संजय भोसले (Pradyumna Bhosale) यांनी ही शाळा सुरू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘एमबीए’चे शिक्षण (MBA Education) घेतलेल्या प्रद्युम्न यांनी सांगली सारख्या ठिकाणी रोबोटिक्सचे शिक्षण देणारी पी.एच.एन. नावाने ही शाळा सुरू केली आहे.

रांजणी : मोबाईल गेममध्ये (Mobile Game) अडकलेल्या मुलांना रोबोटिकची गोडी लागावी, यासाठी रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाने रोबोटिक शाळा (Robotic School) सुरू केली आहे. याठिकाणी रोबोटिक्स, मशीन लर्निंग, कोडिंगचे शिक्षण दिले जाते. सांगली जिल्ह्यातील ही पहिली रोबोटिक शाळा म्हणावी लागेल.

रांजणी येथील प्रद्युम्न संजय भोसले (Pradyumna Bhosale) यांनी ही शाळा सुरू केली आहे. ‘एमबीए’चे शिक्षण (MBA Education) घेतलेल्या प्रद्युम्न यांनी सांगली सारख्या ठिकाणी रोबोटिक्सचे शिक्षण देणारी पी.एच.एन. नावाने ही शाळा सुरू केली आहे. त्याठिकाणी विक्रांत सातपुते प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत. टाळी वाजल्यानंतर किंवा बोलल्यानंतर दिवे सुरू बंद होणे, लाईन फॉलो करणारा रोबो यासारख्या थ्रीडी प्रिंटर्स पाच हजार उपकरण अन्य विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला आहेत.

दर शनिवारी आणि रविवारी याचे वर्ग घेतले जातात. पहिल्या टप्प्यात शाळेतील प्रयोगशाळा सुसज्ज करण्यावर भर दिला आहे. याकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. आजच्या मुलांना मोबाईल वेडापासून दूर करत त्यांच्या कौशल्य शिक्षणावर भर देण्यासाठी ही शाळा कार्यरत आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच हजार उपकरण याठिकाणी आहेत.

ग्रामीण भागातल्या होतकरू विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचे ज्ञान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीचे शिक्षण दिले जात असून तंत्रज्ञान पुढे गेले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग विविध पातळीवर केला जाणार आहे.

-विक्रांत सातपुते, प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT