GST sakal News
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत सर्व गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Sangali News : राज्य विक्री कर विभागाने सुमारे ८४ कोटी ७८ लाख ३८ हजार रुपयांचा विक्रीकर चुकवल्याप्रकरणी वाळवा तालुक्यातील पेठ येथील तिघांवर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, महेश व्हेज ऑईल्स, महालक्ष्मी ऑईल इंडस्ट्रीज यांचे मालक असलेल्या संतोष विष्णू देशमाने, पत्नी सुनीता आणि महेशकुमार गजानन जाधव अशी संबंधित फर्मच्या मालकांची नावे आहेत. सुनीता या राजारामबापू सहकारी दूध संघाच्या माजी संचालक असून, सध्या त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत सर्व गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी राज्य कर निरीक्षक विनीत सर्जेराव पाटील (वय ३७, रा. चिंतामणीनगर, सांगली) व दरिबा शंकर गलांडे (रा. गावभाग सांगली) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांही थकबाकीदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकी भरली नाही. फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांना पोलिस अभियोग प्रस्तावाबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने अभय योजना २०२२ जाहीर केली. या योजनेचा फायदा घेण्याच्या सूचना केल्यानंतरही त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर विक्रीकर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त (कोल्हापूर) सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी उपायुक्त सुनील कानगुडे व संजय माने (सांगली) यांनी गुन्हा दाखल केला.

देशमाने (रा. पुणे बंगळूर रोड, पेठ, ता. वाळवा) यांचा खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. देशमाने यांच्यावर ३६.७२ कोटी, १.४२ कोटी, सौ. देशमाने यांच्यावर २९.७३ कोटी, तर महेशकुमार जाधव (रा. पाण्याची टाकीजवळ, पेठ) यांच्यावर १६.९० कोटी कर थकवल्याचा आरोप आहे. २०१२ पासूनची ही प्रकरणे आहेत.

...तर कारवाई अटळ

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत प्रलंबित थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकीदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. कोल्हापूर विभागातील सर्व मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा तातडीने करावा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा कोल्हापूर विभागाचे राज्य कर सह-आयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT