The administration will decide the rate of essential things.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईहुन आलेल्या जावयाला सासुरवाडीच्या ग्रामस्थांचा विरोध 

शिवाजीराव चौगुले

शिराळा (सांगली)  : संचारबंदीच्या काळात जिल्हा बंदी असताना मुंबईहुन सासुरवाडीत आलेल्या त्या जावयाला सासुरवाडीच्या ग्रामस्थांनी विरोध केल्याने व गावात घर नसल्याने 18 तास पत्नी मुलांसह गाडीतच बसून रहण्याची वेळ आली. 

ही घटना आहे शिराळा तालुक्‍यातील एका गावची. त्याच्या गावा पासून चार किलोमीटरवर अंतरावर सासुरवाडी आहे. तो मुंबईला स्थायिक झाल्याने त्याचे गावात घर नाही. मुंबईहून गावी आला तर तो सासुरवाडीत राहायचा. मुंबईला ज्या ठिकाणी रहात होता. त्याठिकाणच्या परीसरत कोरोनाचे रुग्ण आहेत.

त्याच्या पत्नीचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे तो पत्नी व दोन मुलासह गावी आला. तो गावी येत असल्याची कुणकुण त्याच्या सासुरवाडीतील लोकांना लागली. मुंबईचा जावई आपल्या गावात येतोय म्हटल्यावर सासुरवाडीतील ग्रामस्थांची झोप उडाली. तो जावई आपल्या गावात नको; त्याला त्याच्या गावात जाऊंडे असा पवित्रा घेतला. पण त्याच्या मूळ गावी त्याला स्वतःचे घर नाही. सासुरवाडीत लोकांचा विरोध मग राहायचे कुठे हा प्रश्न पडला. 

या लॉक डाऊनच्या काळात जिल्हाबंदी असल्याने व मुंबईला कोरोना असल्याने त्या पाहुण्यांची जबादारी घ्यायची कोणी हा प्रश्न निर्माण झाला. त्याचे आमच्या गावात घर नाही. त्यामुळे सासुरवाडीत ठेवा. तो तुमच्या गावचा आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्हीच घ्या हा हट्ट सासुरवाडीच्या ग्रामस्थांनी घेतला. हा घोळ मिटे पर्यंत त्यांची गाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात जवळपास 18 तास होती.

मूळ गावात त्याला क्वारंटाईन केले तर त्याला जेवण कोण पुरवणार.सासुरवाडीत क्वारंटाईन केले तर सासरचे लोक जेवण देतील असे मूळ गावच्या लोकांचे म्हणणे होते. मुंबईहून आल्याने ते पाहुणे आमच्या गावात नको; तुमच्या गावात ठेवा. त्यांना सासुरवाडीतील लोक जेवण पोहच करतील. त्या सासुवाडीच्या लोकांनी त्यांना जेवण देताना दोन्हीं गावच्या सुरक्षिततेच्या बाबती काळजी घ्यावी. त्या अटीवर त्यांच्या मूळ गावच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे सासुरवाडीच्या लोकांनी सुटकेचा श्‍वास सोडला. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

'त्यांना चांगलाच अनुभव आहे' Lock Up सुरु होण्याआधीच राडा! सलमान-संजय दत्त बद्दल प्रश्न विचारताच भडकला रितेश, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : विजेचा तडाखा; आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील २५० वर्षे जुने चिंचेचे झाड खाक

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT