पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रात सातारचे 'हे' पत्र हाेतेय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी (ता. 29) भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या संपात सहभागी न होण्याचा निर्णय सातारा शहर व्यापारी संघटना, भवानी पेठ, पोवई नाका व सातारा शहर परिसरातील व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
नागरिक कायदा दुरुस्ती (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सातारा बंदही ठेवण्याचे मोर्चाने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, दुकानदार, कर्मचारी, नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

हेही वाचा-   त्या प्रकरणातून उदयनराजेंसह सर्वांची निर्दाेष मुक्तता

याबाबत सातारा शहर व्यापारी संघटनेने बंद न पाळण्याबाबत प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यात नमूद केले आहे, की भारत बंदमध्ये सातारा शहरातील व्यावसायिक सहभागी होणार नाहीत. आंदोलन हे सरकारच्या निर्णयाविरोधात असते. त्यामुळे आंदोलनात विनाकारण सामान्य जनता व व्यावसायिक भरडले जात आहेत. यापूर्वी ता. 24 रोजी सातारा शहरात बंद पाळण्यात आला होता. या बंदचा आमचा दुरान्वये संबंध नसतानाही अतोनात नुकसान होत आहे.

हेही वाचा-  गोरे बंधू भिडले; परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल

दरम्यान ता. 29 च्या बंदमध्ये साताऱ्यातील व्यापारी सहभागी होणार नाहीत. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिस व प्रशासनाने आम्हास संरक्षण द्यावे, अशी मागणीही पत्रकाद्वारे केली आहे. 
याबाबत प्रकाश गवळी, गुरुप्रसाद सारडा, अजितशेठ शहा, निळकंठ पालेकर, भरतशेठ राऊत, राजेंद्र कासट, सुदीप भट्टड, अशोक बादापुरे, महेश लोया, अजय देवी, संजय भोईटे, विजय येवले यांच्यासह व्यापाऱ्यांनी येथील व्यापारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. सारडा यांनी दिली. बैठकीनंतर त्यांनी केलेले आवाहनाचे पत्र अवघ्या काही तासांत संपुर्ण राज्यात समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागले आहे.

जरुर वाचा - सातारकरांनाे दाेन दिवस पाणी येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT