untitled.png 
पश्चिम महाराष्ट्र

पहा "गंगामाता'  स्मशानातही स्मशान शांतता... 

धनंजय दौंडे

कुंडल (सांगली) ः प्रथेप्रमाणे अक्षय तृतिये निमीत्ताने सर्वजण आपल्या वाड वडीलांचे स्मरणार्थ स्मशानात नैवेद्य अर्पण करत असतात. पण या वर्षी ही परंपरा वैश्विक महामारीचा प्रकोप लक्षात घेऊन खंडीत झाली. कोरोनाचा धोका व संभाव्य गर्दी टाळण्यासाठी कुंडल ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबधात्मक उपाय योजना समितीच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. त्यामुळे यंदा कुंडलच्या गंगामाता स्मशानभूमित शांतताच होती. 

कुंडल येथील गंगामाता स्मशानभूमित हजारो लोक नैवेद्य ठेवण्यासाठी पहाटेपासूनच हजेरी लावत असतात. नैवेद्य व धार्मिक विधीसाठी ग्रामस्थ गर्दी करत असतात. माञ कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुंडल ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबधात्मक उपाययोजना समितीने धार्मिक विधी व नैवेद्य ठेवण्यास मनाई केली होती. याबाबत ध्वनीपेक्षकावरून व कुंडल गावात फलक लावून नागरिकांच्यात जनजागृती हि केली होती. तसेच आज स्मशानभूमि चे प्रवेशद्वार ही बंद केले होते. 

तसेच ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी तेथे पहाटेपासूनच तैनात केले होते. कुंडल ग्रामस्थांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला. कोणीही आज स्मशानभूमित नैवेद्य ठेवण्यासाठी आले नाही.अनेकांनी नैवेद्य घराच्या छतावरच ठेऊन विधी आटोपला. 
तसेच सामाजिक कार्यकर्ते एस.एम. जोशी यांनी हि यंदाचे साली आपण हा नैवेद्य एखाद्या गरजू भुकेल्या व्यक्तिला द्यावा जेणे करून त्याचा आत्मा थंड होईल व अन्नदान केल्याचे पुण्य लागेल . तो नैवेद्य आपल्या आपल्या घराचे बाहेर ठेवा पण चूकून सुध्दा स्मशानात गर्दी करू नका.असे आवाहन श्री .जोशी यांनी केले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT