seeds will be distributed in Belgaum district 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यात होणार 15 हजार टन बियाणांचे वितरण 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव ः जिल्ह्यात पाच लाख हेक्‍टर जमीनमध्ये विविध बियाणींच्या पेरणीचे उद्दिष्ट्ये कृषी खात्याने ठेवले आहे. मागील वर्षी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले होते. तरीही यावर्षी मागील वर्षाप्रमाणेच उद्दिष्ट्ये ठेवले असून यासाठी 15 हजार टन बियाणाचे केंद्रावर वितरण केले आहे. 

जिल्ह्यात वळीव पावसाने हजेरी लावली असून जोरदार पाऊस झाला असल्याने पेरणीपूर्व शेतीची मशागतील प्रारंभ करण्यात आला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात होते, मात्र यंदा चांगला वळीव झाल्याने जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. याचा अधिक फायदा पेरणीसाठी होणार असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्‍त होत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सुरळीत बियाणांचे वितरण करण्यासाठी 188 केंद्रांची निर्मिती केली आहे. तर विविध प्रकारची एकूण 15 हजार टन बियाणांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट्ये कृषी खात्याने ठेवले आहे. 

यावर्षी 5 लाख हेक्‍टर जमिनीमध्ये पेरणीचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आल्याने बेळगाव तालुक्‍यातील सर्वच केंद्रामध्ये बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाणींचे वितरण अनेक केंद्रातून सुरू केले जात आहे. 

मागील वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे उत्पादनातही घट झाली होती. त्यामुळे यंदा कृषी खात्याने सुरळीत खत पुरवठा करण्याचेही नियोजन केले आहे. 

शेतकऱ्यांना अधिक दराने खत विक्री करणाऱ्यांनार कारवाईही करण्यात येणार आहे. त्यासाठी एक वेगळे भरारी फथक लवकरच निर्माण करण्यात येणार आहे. यंदा कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गावात बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी खात्याकडून प्रयत्न सुरू केले आहेत. 

5 लाख हेक्टर जमिनीत पेरणी 

खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करण्यासाठी कृषी केंद्रामध्ये साठा करण्यात आला आहे. यावर्षी 15 हजार टन बियाणे वितरणाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. तर मागील वर्षीप्रमाणे 5 लाख हेक्‍टर जमिनीमध्ये पेरणी केली जाणार आहे. 
झिलाणी मोकाशी 
उपसंचालक, कृषी खाते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार?

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT