Seized unattended vehicles obstructing the road to Kupwad 
पश्चिम महाराष्ट्र

कुपवाडला रस्त्याकडेला अडथळा बनलेली बेवारस वाहने जप्त

ऋषीकेश माने

कुपवाड : प्रभाग समिती तीनच्या हद्दीतील पाच बेवारस वाहने अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे जप्त करण्यात आली. महापालिका आरोग्य विभागानेही या कारवाईमध्ये सहभाग नोंदवला. अतिक्रमण निर्मूलन पथक आणि आरोग्य विभाग कुपवाड यांच्या संयुक्त कारवाईमध्ये वर्षानुवर्षे रस्त्याकडेला अडथळा बनून उभ्या असणाऱ्या पाच वाहनांना जप्त करण्यात आले. 

प्रभाग एक वसंत कॉलनी एम एच 01 व्ही 1123 चारचाकी वाहन,प्रभाग आठ अष्टविनायकनगर दहाव्या गल्लीतील तीन चाकी रिक्षा वाहन एम.एच 10 ए 1289,राजबाग विद्यानगर चारचाकी वाहन एम.एच 12 सी.ए 6025, प्रभाग क्रमांक नऊ माळी वस्तीतील चारचाकी वाहन एम.एच 9 ए.बी 334, संजयनगर बसस्थानकामागील खुल्या जागेत बंद असणारी विनानंबर रिक्षा अश्‍या ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांचा तपशील आहे.

 महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने आरोग्य विभागासह कारवाई केल्याची माहिती सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख दिलीप घोरपडे, आरोग्य निरीक्षक अनिल पाटील,सिद्धांत ठोकळे,अतुल आठवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

सर्व्हेला सुरवात 
कुपवाड परिसरातील चारही प्रभागमध्ये बेवारस वाहनांच्या सर्व्हेला सुरवात झाल्याची माहिती सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. गायकवाड म्हणाले, अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांच्या सर्वेचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत. येत्या चार दिवसात आणखी कारवाई केली जाईल. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT