Min-Uday-Samant Min-Uday-Samant
पश्चिम महाराष्ट्र

तासगावात होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र

सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली): तासगाव (tasgaon)तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठाच्या (shivaji university)उपकेंद्रास तत्वतः मान्यता दिल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant)यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे झालेल्या चर्चेनंतर केली. दोन दिवसात शिवाजी विद्यापीठाची समिती उपकेंद्र उभे करण्याच्या जागेला भेट देणार आहे.आटपाडी खानापूर जत कवठेमहांकाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.(shivaji-university-sub-center-in-tasgaon-sangli-education-marathi-news)

आज या विषयासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स बोलविण्यात आली होती. यामध्ये उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी चे नेते रोहित पाटील, उपकेंद्र समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. आमदार पाटील तासगाव येथील शासकीय विश्रामगृहातून यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

आर आर आबांनी गडचिरोली जिल्ह्यात विद्यापीठाच्या सुविधा उभ्या केल्या, त्या आर आर आबांच्या तालुक्यात शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रास मान्यता देताना मला विशेष आनंद होत आहे. अशा भावना यावेळी उच्च शिक्षण मंत्री सामंत यांनी व्यक्त केल्या. याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या. रोहित पाटील यांनी यावेळी तासगाव तालुक्यात शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र का आवश्यक आहे.याबद्दल भूमिका मांडून यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

या उपकेंदरासाठी बस्तवडे ता तासगाव येथील गायरान असलेली ११० एकर जागा निश्चित करण्यात आली असून याठिकाणी येत्या दोन चार दिवसात शिवाजी विद्यापीठाचे पथक भेट देणार आहे. बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र व्हावे यासाठी दीड दोन वर्षांपूर्वी आमदार सुमनताई पाटील शासनाकडे प्रस्ताव दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे स्वप्नील पाटील यांनी उपकेंद्र तासगाव तालुक्यात व्हावे यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT