1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

मणदूरमध्ये आणखी सहा रुग्ण; रुग्णांची संख्या 198 

सकाळवृत्तसेवा

सांगली : शिराळा तालुक्‍यातील मणदूर येथे आज दिवसभरात आणखी सहा रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या 198 झाली असून सद्यस्थितीत 83 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 


नऊ चिंताजनक 
साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, किडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरूष, किनरेवाडी येथील 35 वर्षीय पुरूष, विहापूर (कडेगाव) येथील 82 वर्षीय पुरूष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरूष अशा नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी सातजण व्हेन्टिलेंटरवर आहेत. 

चार कोरोनामुक्त 
आज दिवसभरात चार जण कोरोनामुक्त झाले असून 83 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. नेर्ली (कडेगाव) येथील 25 वर्षीय तरूणी, नेर्ली (कडेगाव) येथील 51 वर्षीय महिला, खलाटी (जत) येथील 62 वर्षीय पुरूष, औंढी (जत) येथील 30 वर्षीय तरूण असे कोरोनामुक्त झाले आहेत. 

  •  नवे बाधित - 6 
  •  एकूण रुग्ण - 198 
  •  उपचार घेणारे रुग्ण - 83 
  •  बरे झालेले रुग्ण - 108 
  •  मृत्यू - 7 
  •  पॉझिटिव्ह चिंताजनक - 9 
  •  ग्रामीणमधील बाधित - 145 
  •  शहरी भागातील बाधित - 42 
  •  महापालिका क्षेत्र - 11 
     
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sejal Pawar Video Controversy : सेजल पवारच्या व्हिडिओवरून AIMSA च्या पदाधिकारी कनिष्का कालरांची तीव्र नाराजी, "शरिराचा आकार, 'त्या' व्हिडिओमुळे वाईट वाटलं"

Onion Procurement Scam: कांदा खरेदीत ५४ कोटींचा घोटाळा, गतवर्षीच्या खरेदी कांद्यापैकी २९ हजार ७४० टनांची तफावत; अहवालात धक्कादायक माहिती समोर..

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू होण्यापूर्वी व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

SCROLL FOR NEXT