Chikkodi Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

लग्नाचं आमिष दाखवत महाराष्ट्रात घेऊन जाऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सहा आरोपींना 20 वर्षांचा सश्रम कारावास

Minor Girl Abuse : अल्पवयीन मुलीशी मुख्य आरोपी सचिन रायमाने याने ओळख करून घेतली. या ओळखीतून सचिन याने मुलीशी जवळीक साधली.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली. मुख्य आरोपीवर सचिन रायमाने याच्या अपहरण आणि अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल केला.

बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Abuse) प्रकरणात सहा जणांना २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा पोक्सो न्यायालयात काल (ता. १९) ठोठावण्यात आली. २० जून २०१५ मध्ये चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या (Chikkodi Police) कार्यकक्षेत घटना घडली होती.

सचिन बाबासाहेब रायमाने, रूपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने (तिघेही रा. नसलापूर, ता. रायबाग), रोहिणी श्रीमंत दीक्षित (रा. गळतगा, ता. चिक्कोडी), विनोद सुरेश माने, विजय तानाजी साळुंखे (दोघेही रा. कुपवाड, मिरज) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, चिक्कोडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी मुख्य आरोपी सचिन रायमाने याने ओळख करून घेतली. या ओळखीतून सचिन याने मुलीशी जवळीक साधली. तिला लग्नाचे आमिष दाखवत महाराष्ट्रात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर कुपवाड येथे राहण्यासाठी आला आणि तेथे कुली काम करू लागला. या दरम्यान, कुपवाड येथील आरोपींनी मुलीच्या पालकांची भेट घेत त्यांना तुमची मुलगी हवी असल्यास तीन लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्यामुळे पालकांनी या संदर्भात चिक्कोडी पोलिसांशी संपर्क साधला आणि अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली. मुख्य आरोपीवर सचिन रायमाने याच्या अपहरण आणि अत्याचारासंदर्भात गुन्हा दाखल केला. तसेच अन्य आरोपींविरोधात साथ आणि इतर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप होता. या दाव्याची अंतिम सुनावणी तृतीय जिल्हा व विशेष पोक्सो न्यायालयात झाली. यात सर्व सहा आरोपींना दोषी ठरवत त्यांना वीस वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT