Social media welcomed the verdict against Chhindam, saying ... 
पश्चिम महाराष्ट्र

Video : ते म्हणाले, छिंदमचं पद गेलं, बरं झालं... मात्र तो म्हणाला, पुढं बघू

सकाळ वृत्तसेवा


नगर ः महापालिकेतील वादग्रस्त नगरसेवक श्रीपद छिंदम याला महाविकास आघाडी सरकारने दणका दिला आहे. त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या तत्कालीन सभागृहाने केला होता. त्यावर त्यावर देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात काहीच कारवाई झाली नाही, असा शिवप्रेमींचा आरोप होत होता.

काल मंत्रालयात नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावाबाबत सुनावणी घेतली. आणि त्याला पदच्युत केले. या निर्णायाचे सोशल मीडियात जोरदार स्वागत होत आहे. सरकारला धन्यवाद दिले जात आहेत. 

मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशात विद्ममान नगरसेवकपद रद्द असा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. छत्रपती शिवरायांचा त्याने अवमान केला होता. त्याची अॉडिअो क्लिप महाराष्ट्रात व्हायरल झाली होती. शिवप्रेमींचा त्याच्यावर प्रचंड राग होता. त्यामुळे भाजपचा उपमहापौर असलेल्या छिंदमची हकालपट्टी करावी लागली.

महापालिकेच्या तत्कालीन सभागृहाने त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव केला होता. त्यावर ही सुनावणी झाली. त्यानंतर महापालिकेची निवडणूक झाली. त्यात तो विजयी झाला. मंत्र्‍यांनी आदेश करताना विद्यमान नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे पद रद्द असे म्हटले आहे. त्यामुळे नेमका आदेश काय आहे, याचा रात्री उशिरापर्यंत किस काढला जात होता. 

मला या आदेशाबाबत सध्या काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. माझा कोणावर रोषही नाही. मंत्रीमहोदयांनी तत्कालीन ठरावानुसार आदेश केला आहे. न्यायालयात जायचे की कसे याबाबतही काही ठरवलेले नाही, अशी सावध प्रतिक्रिया छिंदमकडून देण्याात आली.

दरम्यान, महापालिका वर्तुळात मात्र, छिंदम या आदेशाच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावरणार असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने त्याने तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महागाईचा भडका! घरगुती LGP सिलिंडरच्या दरात वाढ, १४.२ किलो सिलिंडरची नवी किंमत किती

मान्सून महाराष्ट्रात दाखल! पुण्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

'माधुरीनं माझ्या पत्नीचे कपडे घालून शूटिंग केलं' : टॅक्सीचेही पैसे नव्हते; अभिनेत्याने केलेला मोठा खुलासा, म्हणालेला...

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

SCROLL FOR NEXT