पश्चिम महाराष्ट्र

BREKING.. भाजपचे "इतके' नगरसेवक देणार राजीनामे ! 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवकास उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या सात नगरसेवकांनी पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे. या संदर्भातील पत्र ते उद्या (रविवारी) शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना देणार असल्याचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता "सकाळ'ला सांगितले. पक्षाने राजीनामे स्विकारले नाहीत तर विभागीय आयुक्तांकडे राजीनामे देऊ, असे श्री. वल्याळ म्हणाले. 

व्यक्त केला खेद 
भाजपने उपमहापौरपदाची उमेदवारी राजेश काळे यांना दिली आहे. त्याविरोधात श्री. वल्याळ यांच्यासह राजेश्री पाटील, अश्‍विनी चव्हाण, राजेश्री चव्हाण, जुगनबाई अंबेवाले, संतोष भोसले, सुभाष शेजवाल यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. शहराध्यक्षांना द्यायच्या राजीनामा पत्रात या नगरसेवकांनी म्हटले आहे, श्री. काळे यांना उपमहापौरपदाची उमेदवारी दिल्याचे समजते. मात्र त्यांच्याबाबत अनेक तक्रारी उद्‌भवल्या आहेत. विशेषतः नगरसेविका व महापालिका अधिकाऱ्यांना अपशब्द वापरणे, शिवीगाळ करणे, पक्षाची प्रतिमा मलीन करणे, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबाबत जाहीरपणे भाष्य करणे, ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे यांच्याबाबत जाहीरपणे अपशब्द उच्चारणे अशी कलंकित प्रतिमा असतानाही त्यांना उमेदवारी दिली जाणे हे खूप खेदजनक आहे. 

काटावरचे बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर निवडून आणण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींसमोर असताना एकदम सात नगरसेवकांनी वेगळा पावित्रा घेतल्याने खळबळ उडाली आहे. 


मी पक्षाची प्रतिमा मलिन केली असेल तर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई केली असती. श्री. वल्याळ यांच्या आरोपात तथ्य नाही. वल्याळ कुटुंबियाला भाजपचा वारसा आहे, त्यामुळे ते माझ्या उमेदवारीला निश्‍चित पाठिंबा देतील याचा विश्‍वास आहे. 
- राजेश काळे, उपमहापौरपदाचे उमेदवार, भाजप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT