101 villages in Malshiras taluka affected by Corona total number of affected people is 4119
101 villages in Malshiras taluka affected by Corona total number of affected people is 4119 
सोलापूर

माळशिरस तालुक्‍यातील 108 गावांपैकी 101 गावांना कोरोनाचा विळखा; एकूण बाधितांची संख्या चार हजार 119 

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाने जवळजवळ संपूर्ण तालुकाच कवेत घेतला असून तालुक्‍यातील 108 गावांपैकी 101 गावात एकूण 4119 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवार (ता. 24) रोजी संपूर्ण देशभर लॉकडाउन जाहीर केला. माळशिरस तालुक्‍यात सुरवातीच्या दोन्ही लॉकडाउनमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र लॉकडाउन तीनमध्ये तालुक्‍यातील संग्रामनगर-अकलूज येथे पहिल्यांदा दोन रुग्ण आढळले. प्रशासनाने या दोन रूग्णांसह संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण करीत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत असतानाच लॉकडाउन चार व पाचमध्ये कोरोनाचा नजीकच्या गावात प्रादुर्भाव वाढला त्यानंतर सरकारने आनलॉक सुरु केले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. संग्रामनगर येथील दोन रुग्णांनी सुरु झालेला कोरोना संसर्ग आज तालूक्‍यातील 101 गावात पसरला आहे. 
तालुक्‍यातील अकलूज येथे सर्वाधिक 876 रूग्ण, माळशिरस येथे 315, यशवंतनगर येथे 191, बोरगाव 183, वेळापूर येथे 162, संग्रामनगर येथे 137, माळीनगर येथे 116, नातेपुते 281, माळेवाडी येथे 76, एकशिव 12, कोंडभावी 6, शिंदेवाडी 16, विझोरी 26, निमगाव 24, सदाशिवनगर 39, गुरसाळे 24, फळवणी 5, मांडवे 69, गिरवी 5, महाळुंग 107, उघडेवाडी 14, वाफेगाव 8, लवंग 42, उंबरे (वे) 13, सवतगाव 26, श्रीपूर 124, धर्मपुरी 53, माळखांबी 19, फोंडशिरस 101, दहीगाव 33, खंडाळी 57, चाकोरे 23, कन्हेर 34, संगम 14, गिरझणी 12, नेवरे 40, मेडद 20, पडसमंडळ 20, बागेचीवाडी 37, पिलीव 61, शेंडेचिंच 19, पठाणवस्ती 6, वाघोली 44, कोंडारपटटा 35, आनंदनगर 21, पानीव 11, तांबवे 20, तांदुळवाडी 13, कुसमोड 8, चौडेश्वरवाडी 13, बिजवडी 9, दसूर 14, बोंडले 26, देशमुखवाडी 4, डोंबाळवाडी (मो) 12, गोरडवाडी 19, मळोली 19, उंबरेदहीगाव 21, मारकडवाडी 18, तिरवंडी 6, चांदापुरी 5, भांबुर्डी 22, पुरंदावडे 15, पिरळे 3, मोरोची 34, जांबुड 13, जाधववाडी 3, गारवाड 14, तरंगफळ 5, खुडूस 27, तामशिदवाडी 18, झिंजेवस्ती 6, माणकी 27, तोंडले 19, पिसेवाडी 20, इस्लामपूर 16, कुरबावी 4, कारूंडे 14, तांबवेवाडी 3, कचरेवाडी 5, बांगर्डे 2, बचेरी 10, लोणंद 13, माळेवाडी (बो) 3, धानोरे 2, कोळेगाव 4, रेडे 9, बाबुळगाव 3, वटपळी, खळवे, येळीव, डोंबाळवाडी, जळभावी व भांब येथे प्रत्येकी 1 असे एकूण 4119 रूग्ण आढळले आहे. त्यापैकी 2762 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 1277 रूग्णांवर उपचार चालू आहेत. तालुक्‍यात आज अखेर 80 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT