1Corona_20akola_2001_1.jpg 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये उरले 1739 रुग्ण ! आज 138 पॉझिटिव्ह तर पाचजणांचा मृत्यू  

तात्या लांडगे

सोलापूर : ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. मात्र, मृतांची वाढणारी संख्या चिंताजनक असून सध्या एक हजार 739 रुग्ण उरले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज पंढरपूर तालुक्‍यातील लक्ष्मी टाकळी येथील 67 वर्षीय पुरुष तर जळोलीतील 80 वर्षीय पुरुष आणि भाळवणीतील 48 वर्षीय पुरुषाचा, माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील 75 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापुरातील कोंडीतील 76 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज तब्बल तीन हजार 86 संशयितांची टेस्ट पार पडली असून 45 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर ग्रामीणमधील दोन लाख 50 हजार 836 संशयितांची झाली टेस्ट 
  • आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 31 हजार 403 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आज 105 रुग्णांना सोडले घरी; नव्या 138 रुग्णांची पडली भर 
  • आज पाच रुग्णांचा कोरोनाने घेता बळी; ग्रामीणमधील मृतांची संख्या 93 झाली 
  • आतापर्यंत 28 हजार 733 रुग्ण झाले बरे; आता एक हजार 739 रुग्णांवर उपचार


आज सोलापूर ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट तालुक्‍यात एकही रुग्ण आढळलेला नाही. तर बार्शीत 19, करमाळ्यात पाच, माढ्यात 14, माळशिरसमध्ये 11, मंगळवेढ्यात पाच, मोहोळमध्ये 11, उत्तर सोलापुरात सहा, पंढरपुरात 53, सांगोल्यात 12 आणि दक्षिण सोलापुरात दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे आता अक्‍कलकोट तालुक्‍यात 19 रुग्ण उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर बार्शीतील 163, करमाळ्यातील 86, माढ्यातील 358, माळशिरसमधील 297, मंगळवेढ्यातील 56, मोहोळमधील 220, उत्तर सोलापुरातील 15, पंढरपुरातील सर्वाधिक 472, सांगोल्यातील 24 आणि दक्षिण सोलापुरातील 25 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT