corona 
सोलापूर

सोलापूर महापालिका हद्दीत 27 नवे कोरोना बाधित, एकाचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिका हद्दीत रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 882 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 855 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी 15 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही नोंद आजच्या अहवालात घेण्यात आली आहे. 

सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता दहा हजार 173 झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 558 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 524 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 हजार 91 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये भवानी पेठेतील मुकुंदनगर, आरटीओ ऑफिस जवळील निखिल पार्क, कोटणीस नगर, अत्तार नगर, तालुका पोलीस स्टेशन जवळील आंबेडकर नगर, जुळे सोलापुरातील गोकुळ नगर, हत्तुरे वस्ती परिसरातील स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती परिसरातील ओम नमः शिवाय नगर, चौगुले पार्कमधील जय प्लाझा, वीरशैव नगर, विजापूर रोड वरील आदित्य नगर, वसंत विहार, सोनी नगर, व्हीएमजीएमसी हॉस्टेल या ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

सोलापूर शहरातील 110 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 87 जण अद्यापही इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोना चाचणीचे 271 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. महापालिका हद्दीतील 1 लाख 4 हजार 643 कोरोना चाचण्यांचे अहवाल आत्तापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT