सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक sakal
सोलापूर

जिल्हा बॅंकेचे कर्मचारी ९५० अन्‌ थकबाकी वसुलीचे ८०० कोटीचे टार्गेट; एकरकमी परतफेड योजनेकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची पाठ

एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली असून ३० सप्टेंबरपर्यंत योजनेची मुदत आहे. तरीपण, अजूनही २२ हजार ६८१ जणांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे आता बॅंकेतील प्रत्येक शिपाई, लिपिक, शाखाधिकाऱ्यांना ५० लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गरजेला कर्जरुपाने अर्थसहाय करूनही २३ हजार १९९ शेतकऱ्यांनी अद्याप कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरु केली असून ३० सप्टेंबरपर्यंत योजनेची मुदत आहे. तरीपण, अजूनही २२ हजार ६८१ जणांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे आता बॅंकेतील प्रत्येक शिपाई, लिपिक, शाखाधिकाऱ्यांना ५० लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामात जवळपास ९० हजार शेतकऱ्यांना एक हजार कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले जाते. यंदा ८० टक्क्यांपर्यंत बॅंकेने कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २०० हून अधिक शाखा असलेली एकमेव जिल्हा बॅंक आहे. परंतु, ३० जूनअखेर शेतकऱ्यांकडे बॅंकेची अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे तब्बल ७४५ कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. त्याची वसुली सुरु असतानाच आता जुन्या थकबाकीदारांमुळे बॅंकेची डोकेदुखी वाढली आहे.

बॅंकेवर प्रशासकराज येऊन आता दोन वर्षाचा कालावधी संपला, पण थकबाकीची अपेक्षित वसुली झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता बॅंकेतील शिपायापासून शाखा अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या गावातील, परिसरातील पाच थकबाकीदारांकडील कर्जाच्या वसुलीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे. तरीदेखील आतापर्यंत ‘ओटीएस’मधून २३ हजार १९९ पैकी ५१८ शेतकऱ्यांनीच कर्जाची थकबाकी भरली आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन बॅंकेने केले आहे.

प्रत्येक कर्मचारी दहा लाखांची ठेव

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यात २०७ शाखा असून त्यात जवळपास ९५० कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासक असतानाही बॅंकेने गतवर्षी ३५० कोटींच्या ठेवी वाढविल्या होत्या. सध्या बॅंकेच्या चार हजार कोटींपर्यंत ठेवी अहेत. आता यंदा मार्च २०२४ पर्यंत एकूण ठेवी साडेपाच ते सहा हजार कोटींपर्यंत होतील, असे प्रशासक कुंदन भोळे यांनी केले आहे. त्यादृष्टीने बॅंकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यास १० लाखांचे उद्दिष्ट दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांची बॅंक आता मायक्रो फायनान्स करीत असून गोल्ड लोन, वैयक्तिक कर्ज देखील देऊ लागली आहे. तब्बल १०० वर्षे खातेदारांसह शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केलेल्या जिल्हा बॅंकेच्या ठेवी निश्चितपणे वाढतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.

जिल्हा बॅंकेची स्थिती

  • एकूण शाखा

  • २०७

  • बॅंकेचे कर्मचारी

  • ९५४

  • बॅंकेच्या अंदाजित ठेवी

  • ४००० कोटी

  • शेतकऱ्यांकडील अंदाजे थकबाकी

  • ८०० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT