BHAJIPALA GARDI.jpg 
सोलापूर

लाॅकडाउनंतर सोलापूर शहरात भाजीपाला खरेदी वगळता इतर दुकाने बंद असल्याने संभाव्य गर्दीला ब्रेक

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः शहरातील दहा दिवसाचा लॉकडाउन संपल्यानंतर सोमवारी (ता.27) सकाळी भाजीपाला व किराणा दुकांनावर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील विवीध भागात भाजीपाला विक्रीची सोय केली असल्याने स्थानिक नागरिक खरेदीला आले होते. इतर सर्व प्रकारची दुकाने मंगळवार (ता.28) समविषम तारखाच्या नियोजनानुसार सुरू होणार आहेत. त्यासोबत दहा दिवसानंतर कामावर जाण्यासाठी, शासकीय कामे व बॅंकांच्या कामासाठी वाहनांची वर्दळ सुरू झाली. 


दहा दिवस शहरात लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर नागरिक आज सकाळपासून खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र प्रशासनाने केवळ किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीची परवानगी दिलेली होती. त्यातही बहुतांश नागरिकांनी पहिल्या दिवशी खरेदीसाठी गर्दी होईल या अंदाजाने काहीशी कमी हजेरी लावली होती. मात्र शासकीय कार्यालये व कंपनी उद्योगाच्या ठिकाणी कामावर पोहोचण्यासाठी वाहनाने जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर मोठी संख्या होती. तसेच बॅंकांचे व्यवहार व शासकीय कामे करण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी झालेली होती. 

भाजीपाला खरेदीसाठी शहराच्या विविध भागात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सोय करण्यात आलेली होती. तरीही काही भागात लोकांनी सोशल डिस्टन्सचा नियम मोडून भाजी खरेदी केली. काही ठिकाणी वाहने भाजी मंडीच्या लगत लावून ये जा करण्याची अडचण केली. कापड, जनरल वस्तु, रेडीमेड, मोबाईल अशा सर्व प्रकारची दुकाने मंगळवार (ता.28) पासून सुरू होतील. लॉकडाउन पुर्वी प्रशासनाने या दुकांनाना समविषम तारखेनुसार दुकाने उघडण्याचे नियोजन दिले आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठ उघडणार आहे. काही दुकानदारांनी बाहेरून दुकाने बंद करत दुकानांची साफसफाई केली. बाजारपेठेत काही हातावरचे पोट असलेल्या कारागिरांनी रस्त्यावर वाहन दुरुस्ती, घरगुती वस्तुची विक्री आदीची दुकाने थाटली होती. किराणा दुकानावर त्या प्रमाणात गर्दी कमी होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT