सोलापूर

Solapur News : जनावरांना उन्हाच्या तडाख्यात शॉवरचा गारवा; नातेपुतेतील शेतकऱ्याची शक्कल

सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण घरात फॅन, कुलर, ए.सी. इत्यादी साधनांनी गारवा निर्माण करून कडक उन्हापासून बचाव करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते : सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत अनेक जण घरात फॅन, कुलर, ए.सी. इत्यादी साधनांनी गारवा निर्माण करून कडक उन्हापासून बचाव करीत आहेत. मात्र नातेपुतेतील राया शेती फार्ममध्ये मुऱ्हा म्हशी आणि सहिवाल गाईचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी चक्क शॉवर बसविण्यात आले आहेत.

घरगुती जुगाड करून जनावरांना गारवा मिळावा यासाठी प्रयोग केला आहे. त्यामुळे जनावरे उन्हात शॉवरचा आनंद घेत आहेत.नातेपुते येथील राया विवेक राऊत यांच्या राया शेती फार्ममध्ये भागवत ऊर्फ माऊली सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुऱ्हा म्हशी आणि सहिवाल गाईला शॉवर बसवले आहेत.

हे शॉवर पाठीवरील कीटकनाशक फवारणीच्या पंपाला जोडले असून, पंप चार्जिंग केल्यानंतर त्या पंपातील पाइप १६ एम.एम. प्लेन लॅटरला जोडण्यात आली आहे. प्रत्येकी दहा फुटावर शॉवर जोडले आहेत. या शॉवरखाली म्हशी आणि सहिवाल गाई येऊन उभा राहतात आणि मनसोक्त आनंद घेत आहेत. त्यांना एसीचा आनंद मिळत आहे. कडक उन्हापासून सुटका होत आहे.

सर्वत्र वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी झाडे विशेषतः लिंब, वड, पिंपळ, आंबा इत्यादी मोठी झाडे लोप पावली आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात प्रत्येक जनावर ही खुंटीला बांधून आहेत.

काही प्रगत शेतकरी मुक्त संचार गोठा करून जनावरांची काळजी घेत आहेत. मात्र सध्याच्या उन्हापासून मुक्या जनावरांची सुटका व्हावी यासाठी नातेपुतेतील हा उपाय केल्याने जनावरांना उन्हात पावसाळी आनंद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT